नांदेड| अति थंडी आणि बर्फाचा प्रभाव झाल्याने मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील हिरानगर तांडा येथील जवान हवलदार सुधाकर शंकर राठोड आज शहीद झाले आहेत.
चंदीगड येथे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना आज 25 नोंव्हेंबर 2024 रोजी त्यांचा मृत्यू झाला. उद्या त्यांचे पार्थिव त्यांच्या गावी मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील हिरानगर तांडा येथे येणार आहे.
हवलदार सुधाकर शंकर राठोड हे 127 लाईट एअर डिफेन्स रेजिमेंटचे जवान होते. त्यांची पारिवारीक माहिती पुढीलप्रमाणे आहे. वडीलाचे नाव दिवगंत शंकर सखाराम राठोड व आई श्रीमती धोंड्याबाई शंकर राठोड, भाऊ मधुकर शंकर राठोड, पत्नी श्रीमती आशा सुधाकर राठोड, मुलगा ओम सुधाकर राठोड (वय 8 वर्ष), मुलगी सपना सुधाकर राठोड (वय 6 वर्ष) आहे. भाऊ मधुकर शंकर राठोड असा त्यांचा परिवार आहे.