हदगाव| हदगाव तालुक्यातील तळणी व निवघा परिसरात भुसारचे व्यापारी स्व.माधवरावजी देशमुख यांचं दुःखद निधन झालं आहे. त्यांच्या निधनाने देशमुख परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख विवेक देशमुख व रवी कुमार देशमुख यांचे वडील व अविनाश देशमुख यांचे काका स्व.माधवरावजी देशमुख हे तळणी व निवघा परिसरात भुसारचे विश्वसनीय व्यापारी म्हणून परिसरातील सर्व गावांमध्ये लोकप्रिय होते. त्यांच्यावर गेले ५-६वर्षापासुन आठवड्यात दोन वेळा डायलिसिस करण्यात येत होते. मात्र अचानक १२-१३ दिवसांपासून त्यांची तब्येत बिघडली म्हणून भगवती हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर नातू डॉ अंकुश देवसरकर यांच्याकडे अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते.
स्व.माधवरावजी देशमुख यांनी मृत्यूसोबत खुप झुंज दिली. आज त्यांच दुःखद निधन झालं. त्यांच्या निधनाने देशमुख कुटुंबात दुःखाचा डोंगर कोसळला असून, प्रत्येकाला मद्दत करण्याचा त्यांचा स्वभाव, लहान -मोठे काम करून यशस्वी होण्यासाठी सर्वाना ते सतत मार्गदर्शन करत होते. असा जेष्ठ मार्गदर्शक कालच्या पाडयाड गेला असल्याची भावना व्यक्त करत आमदार बाबुराव कदम कोहळीकर व समर्थक परिवार हदगाव -हिमायतनगर विधानसभा तथा निवघा -तळणी शिवसेना विभाग प्रमुख सुदर्शन पाटील मनुलकर यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.