HomeनांदेडGudi Padwa : गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर कारला येथे अखंड हरिनाम सप्ताह

Gudi Padwa : गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर कारला येथे अखंड हरिनाम सप्ताह

हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार|गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर कारला येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह, शिवपुराण कथा व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा भक्तीमय सोहळा १९ मार्चपासून सुरू होऊन २६ मार्चपर्यंत चालणार असून पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.

कारला गावात गेल्या अकरा वर्षांपासून अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा अखंडपणे सुरू आहे. यंदाही गुढीपाडव्याच्या पावन मुहूर्तावर या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून यात भव्य शिवपुराण कथा व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचा ज्ञानयज्ञ पार पडणार आहे. या सप्ताहात शिवपुराण कथा ह.भ.प. बालयोगिनी मुक्ताईनाथ गुरु महेश्वरीनाथ यांच्या वाणीतून सादर होणार आहे, तर ज्ञानेश्वरी पारायणाचे व्यासपीठ गणेश महाराज मुटेवाड हे सांभाळणार आहेत.

सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रमांत सकाळी काकडा भजन व ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी २ ते ५ या वेळेत शिवपुराण कथा, सायंकाळी हरिपाठ आणि रात्री हरिकीर्तन तसेच रात्रभर जागरणाचा कार्यक्रम होणार आहे.

या सप्ताहात विविध कीर्तनकारांचा सहभाग लाभणार असून किरण महाराज शेगावकर, लक्ष्मण महाराज मांडवाड, ह.भ.प. कृष्णा महाराज बोंपीलवार कार्लेकर, ह.भ.प. बालयोगी गजेन्द्र चैतन्य महाराज, ह.भ.प. प्रकाश महाराज वाळकेवाडीकर, ह.भ.प. गुरुवर्य महारुद्र स्वामी महाराज आणि ह.भ.प. भगवतीताई महाराज सातारकर यांचे हरिकीर्तन होणार आहे. सप्ताहाच्या समारोपाच्या दिवशी काल्याचे कीर्तन रमेश महाराज बुचाले पुर्णेकर यांच्या वाणीतून होणार आहे.

शिवपुराण कथा सोहळ्यात गायनाचार्य ह.भ.प. लक्ष्मण महाराज मंदेवाड, ह.भ.प. मारोती महाराज सिबदरेकर, ह.भ.प. भगवान महाराज गुंफलवाड, ह.भ.प. नारायण महाराज वडगावकर, ह.भ.प. दशरथ महाराज नरोटे यांच्यासह अनेक हरिभक्त सहभागी होणार आहेत. काकडा संचासाठी हार्मोनियम वादक ह.भ.प. रामदास महाराज बोंपीलवार, तबलावादक रामराव लुम्दे, मृदंगाचार्य प्रथमेश एटलेवाड आदी कलाकारांची साथ लाभणार आहे.

सप्ताहाच्या समारोपाच्या दिवशी काल्याच्या कीर्तनानंतर भाविकांसाठी शिरा-पुरी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सप्ताहाच्या आयोजनात बजरंग दलाकडून सेवाकार्य करण्यात येणार आहे.
या अखंड हरिनाम सप्ताह, शिवपुराण कथा व ज्ञानेश्वरी पारायणाच्या भक्तीमय सोहळ्याचा पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन कारला ग्रामस्थांनी केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments