Wednesday, May 13

Rajeshwarrao Chintawar passes away : श्री परमेश्वर मंदिराचे माजी सचिव राजेश्वरराव चिंतावार यांचे निधन

हिमायतनगर| श्री परमेश्वर मंदिराचे माजी सचिव तथा संचालक राजेश्वरराव विश्वनाथराव चिंतावार यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी गुरुवारी सकाळी ७.३५ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने धार्मिक व सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

चिंतावार यांनी श्री परमेश्वर मंदिराच्या कार्यात अनेक वर्षे योगदान देत मंदिराच्या विकासासाठी मोलाची भूमिका बजावली होती. त्यांच्या कार्यकाळात मंदिरातील विविध उपक्रमांना चालना मिळाली होती.

त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी ५ वाजता वैकुंठधाम स्मशानभूमी, बोरगडी रोड, हिमायतनगर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या मृत्यू पश्चात, भाऊ, सात मुली, एक मुलगा, सून, नातू, कुटुंबीय, नातेवाईक व मोठा मित्रपरिवार असा आप्तपरिवार आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती प्रदान करो हीच नांदेड न्यूज लाईव्ह परिवारातर्फे भावपुर्ण श्रद्धांजली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!