HomeनांदेडHimayatnagar Accident : म्हसोबा नाल्यावर मृत्यूचा सापळा; भरधाव वाहनाच्या धडकेत तरुण ठार

Himayatnagar Accident : म्हसोबा नाल्यावर मृत्यूचा सापळा; भरधाव वाहनाच्या धडकेत तरुण ठार

हिमायतनगर| तालुक्यात सलग अपघातांच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना सरसम–हिमायतनगर मार्गावर पुन्हा एक भीषण अपघात घडला. म्हसोबा नाल्याजवळ झालेल्या या दुर्घटनेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी सायंकाळी सुमारे ८.३० वाजताच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, सरसम येथील रमेश गुंडेकर, अविनाश गोखले व लखन पंड्या हे तिघे मोटरसायकलवरून हिमायतनगरहून सरसमकडे जात होते. दरम्यान, भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

IMG 20260410 WA0074 Himayatnagar Accident : म्हसोबा नाल्यावर मृत्यूचा सापळा; भरधाव वाहनाच्या धडकेत तरुण ठार

या अपघातात लखन पंड्या यांचा जागीच मृत्यू झाला, तर रमेश गुंडेकर व अविनाश गोखले हे गंभीर जखमी झाले. जखमींना तत्काळ हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

IMG 20260410 WA0072 Himayatnagar Accident : म्हसोबा नाल्यावर मृत्यूचा सापळा; भरधाव वाहनाच्या धडकेत तरुण ठार

अपघातानंतर वाहनचालक फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे सरसम–हिमायतनगर मार्गावरील वाहतुकीच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. दरम्यान, नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

IMG 20260410 205045 Himayatnagar Accident : म्हसोबा नाल्यावर मृत्यूचा सापळा; भरधाव वाहनाच्या धडकेत तरुण ठार
Oplus_16908288

“सलग अपघातांमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. राष्ट्रीय महामार्गावर तात्काळ स्पीड ब्रेकर व सुरक्षा उपाययोजना करणे गरजेचे आहे,” अशी मागणी नागरिकांनी केली. “अपघातांची मालिका थांबवण्यासाठी प्रशासनाने केवळ तपासणी नव्हे तर ठोस उपाययोजना राबवणे आवश्यक आहे,” असेही नागरिकांचे मत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरत आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments