Homeनांदेडअयोध्येपासून श्रीलंकेपर्यंत सायकल प्रवास! प्रभू श्रीरामभक्त शिवम यांचा हिमायतनगरमध्ये मुक्काम

अयोध्येपासून श्रीलंकेपर्यंत सायकल प्रवास! प्रभू श्रीरामभक्त शिवम यांचा हिमायतनगरमध्ये मुक्काम

२२ जून २०२४ पासून भारतभ्रमणाला सुरुवात; श्री परमेश्वर मंदिरात स्वागत करून पुढील प्रवासासाठी दिल्या शुभेच्छा

हिमायतनगर, अनिल मादसवार| प्रभू श्रीराम यांच्यावरील अपार श्रद्धा आणि भारतभ्रमणाचा संकल्प मनाशी बाळगून उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्याचे रहिवासी शिवम हे सायकलने भारतभ्रमण करत आहेत. २२ जून २०२४ पासून सुरू झालेल्या या प्रवासादरम्यान अयोध्येपासून श्रीलंकेपर्यंत पोहोचण्याचे ध्येय त्यांनी ठेवले आहे.

या प्रवासादरम्यान शिवम हे माहूरमार्गे हिमायतनगर (वाढोणा) शहरात दाखल झाले. येथील श्री परमेश्वर मंदिरात त्यांचा मुक्काम होता. यावेळी त्यांची भेट घेऊन भाजपा युवा मोर्चा विधानसभा अध्यक्ष रामभाऊ सूर्यवंशी यांनी प्रवासाची माहिती जाणून घेत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

FB IMG 1791767147070 अयोध्येपासून श्रीलंकेपर्यंत सायकल प्रवास! प्रभू श्रीरामभक्त शिवम यांचा हिमायतनगरमध्ये मुक्काम

हिमायतनगर येथून शिवम हे औंढा नागनाथमार्गे पुढील प्रवासाला निघाले आहेत. प्रभू श्रीरामांवरील श्रद्धा, जिद्द आणि सायकलने देशभ्रमण करण्याचा त्यांचा संकल्प नागरिकांसाठी आकर्षणाचा विषय ठरत आहे. यावेळी रामभाऊ सूर्यवंशी, कात्रे मामा, नारायण माने, आशुतोष बोरेवाड, धोंडोपंत बनसोडे, मनोज पाटील, ज्ञानेश्वर कोरडे, अनिल सूर्यवंशी, विशाल कदम, आदित्य मुत्तलवाड, आदिसह परमेश्वर मंदिरातील कर्मचारी भाविक उपस्थित होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments