नांदेड/भोकर| पोलीस स्टेशन भोकर यांच्या हद्दीत अवैद्यरित्या रेतीची वाहतूक करीत असलेल्या मिळालेल्या माहितीवरून भोकर पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी रात्रगस्त पेट्रोलिंग दरम्यान गौण खनिजांची चोरटी विक्री करणारे इसमांविरुध्द कारवाई करुन 6 लक्ष 25 हजार रुपयाचा मुद्येमाल जप्त केला आहे. या कार्यवाहीमुळे रेती चोरामध्ये खळबळ उडाली असून, भोकर मार्गाने होणारी रेतीची अवैद्य वाहतूक व विक्री थांबण्यास मदत होणार आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड, यांनी पोस्टे हद्दीतील गौण खनिजांची वाहतुक करणारे इसमांवर कारवाई करणे बाबत आदेशित केले. त्या अनुषंगाने दिनांक 24/12/2024 रोजी 00.25 वा.चे सुमारास म्हैसा वाय पॉईट, भोकर जवळ एक हायवा क्र. MH-26-CH-0005 मधुन अवैधरित्या गौण खनिजाची चोरटी विक्री करण्याकरीता वाहतुक करीत असल्याची माहिती मिळाल्याने शैलेंद्र औटे, स.पो.नि., पो.स्टे. भोकर व पोस्टेचे पोलीस अंमलदार यांनी रात्रगस्त पेट्रोलिंग दरम्यान हायवा क्र. MH-26-CH-0005 च्या चालकाने त्याचे ताब्यातील वाहन हे हयगई व निष्काळजीपणे भरधाव वेगात चालवून रेतीची रॉयल्टी व वाहनाचे कागदपत्रे न बाळगता हायवामध्ये अवैधरित्या गौण खनिज अंदाजे 05 ब्रास काळी रेती असा एकुण 6,25,000/- रुपयाचा मुद्देमाल म्हैसा वाय पाँईट भोकर ता. भोकर जि नांदेड येथे मिळून आल्याने पंचासमक्ष जप्त करण्यात आला. त्यास ताब्यात घेवून पोलीस स्टेशन भोकर येथे गुन्हा दाखल असून सदर आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून, सदर गुन्हयाचा अधिक तपास पोहेकों / 812 दिपक कंधारे हे करीत आहेत.
हि कार्यवाही अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड, खंडेराय धरणे, अपर पोलीस अधीक्षक साहेब, भोकर, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक साहेब, नांदेड, श्रीमती शफकत आमना, सहायक पोलीस अधीक्षक, उपविभाग भोकर यांचे मार्गदर्शनाखाली, सपोनि श्री. शैलेंद्र औटे, पोलीस अंमलदार, पो.हे.कॉ./ 926 राजेश्वर कळणे, पोकों/ 2464 प्रमोद जोंधळे, पोकों/ 3162 गुरुदास आरेवार यांनी केली आहे. याबाबत प्रमोद उध्दवराव जोंधळे वय 32 वर्ष, व्यवसाय नौकरी पोकों / 2464 नेमणुक पोलीस स्टेशन भोकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गु.र.नं. 503/2024 कलम 281,303(2) भारतीय न्याय संहिता सहकलम 130/177 मोटार वाहन अधिनियम 1988 अंतर्गत आरोपी जालींदर आनंदा हनुमंते वय 29 वर्षे, व्यवसाय चालक रा. माळकौठा ता. मुदखेड जि. नांदेड यांचेवर गुन्हा दाखल केला असून, गौण खनिज अंदाजे 05 ब्रास काळी रेती प्रति. ब्रास कि.अ.’ 5,000/- याप्रमाणे 25,000/-, एक हायवा क्रं. MH-26-CH-0005 जु.वा.कि.अं. 6,00,000/- असा एकुण 6,25,000/- रु.चा असा मुद्देमाल जप्त केला आहे.