मुखेड/नांदेड| मिळालेल्या गुप्त माहितीवरून मुखेड पोलिसांनी देगलुर रोडने हायवा विनापरवाना अवैधपणे लाल रेती चोरटी वाहतुक करीत असल्याचे थांबवून कार्यवाही केली आहे. या कार्यवाहीत दोन रोपावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्याकडून एकुण २०,४५,०००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी अवैध रेती वाहतुक करणारे वाहनांची माहिती काढुन कार्यवाही करणेसाठी आदेश दिले होते. त्या अनुषंगाने मुखेड पो.स्टे. हद्दीत अवैध रेती वाहतुक करणारे वाहनांची माहिती काढुन केसेस करणे कामी पोलीस पथक दि. २३/१२/२०२४ रोजी सकाळी रवाना झाले. मिळलेल्या गुप्त माहितीवरून मौजे जाहुर चौकात येथे गेलो असता देगलुर रोडने एक हायवा विनापरवाना अवैधपणे लाल रेती चोरटी वाहतुक करीत येत होता. सकाळी ०८.१० वाजता एक हायवा मध्ये लाल रेती भरुन येत असतांना दिसुन आला त्यास थांबवून चालकाकडे रेती वाहतुक परवाना बाबत विचारपुस केली असता त्याने परवाना नसल्याने सांगीतले.
सदरची रेती त्याचे मालकाचे सांगण्यावरुन आणली असल्याचे सांगीतले आहे. तरी यातील हायवा चालक व हायचा मालक यांनी लाल रेती हायवामध्ये अवैधपणे चोरटी वाहतुक करीत असतांना मिळुन आल्याने प्रदिप रामराव शिंदे वय ३९ वर्ष पोकों/९२९ पो.स्टे. मुखेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी आकाश सोपान वाघमारे रा. राजुरा ता. मुखेड जि. नांदेड, मारोती पुंडलिक जंगमवाड रा.राजुरा ता. मुखेड जि. नांदेड यांच्यावर कलम ३०३ (२), ३ (५) भा. न्या. से सहकलम ४८ (७), ४८(८) महाराष्ट्र जमीन महसुल संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कार्यवाहीबाचत वरीष्ठांनी मुखेड पो.स्टे. चे अभिनंदन केले आहे.
या कार्यवाहीत लाल रेती अंदाजे ९ ब्रास प्रत्येकी किंमती ५०००/- रुपये ब्रास प्रमाणे असे एकुण ४५०००/- रुपयाचा माल आणि एक अशोक लिलैंड कंपनीचा हायचा क्रं. टीएस ०९-युडी-१३०४ समोरील बाजुस अशोक लिलैंड असे नाव असलेला जुना वापरता किंमती अंदाजे २०,००,०००/- असा एकुण २०,४५,०००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. हि कार्यवाही अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, संकेत गोसावी, उप विभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग देगलुर यांचे मार्गदर्शनाखाली लक्ष्मण केंद्रे, पोलीस निरीक्षक, पो.स्टे. मुखेड, पोकों/९२९ प्रदीप शिंदे पो.स्टे. मुखेड यांनी केली आहे.