Mukhed police arrested : मुखेड पोलिसांनी रेती चोरीच्या गुन्हयातील आरोपीस अटक; २० लक्ष ४५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला -NNL
मुखेड/नांदेड| मिळालेल्या गुप्त माहितीवरून मुखेड पोलिसांनी देगलुर रोडने हायवा विनापरवाना अवैधपणे लाल रेती चोरटी वाहतुक करीत असल्याचे थांबवून कार्यवाही केली आहे. या कार्यवाहीत दोन रोपावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्याकडून एकुण २०,४५,०००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी अवैध रेती वाहतुक करणारे वाहनांची माहिती काढुन कार्यवाही करणेसाठी आदेश दिले होते. त्या अनुषंगाने मुखेड पो.स्टे. हद्दीत अवैध रेती वाहतुक करणारे वाहनांची माहिती काढुन केसेस करणे कामी पोलीस पथक दि. २३/१२/२०२४ रोजी सकाळी रवाना झाले. मिळलेल्या गुप्त माहितीवरून मौजे जाहुर चौकात येथे गेलो असता देगलुर रोडने एक हायवा विनापरवाना अवैधपणे लाल रेती चोरटी वाहतुक करीत येत होता. सकाळी ०८.१० वाजता एक हायवा मध्ये लाल रेती भरुन येत असतांना दिसुन आला त्यास थांबवून ...
