नांदेड| पोलीस स्टेशन कुंडलवाडी यांनी एक अवैद्य रेती वाहतुक करणारा टेम्पो किमंती ४ लक्ष 16000 रु चा मुद्देमाल जप्त केला आहे. हि कार्यवाही पोलीस स्टेशन कुंडलवाडी व विशेष पथक क्र 04 नांदेड यांनि केली आहे. या कार्यवाईमुळे गौण खनिजाची अवैध्य वाहतूक करणार्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर वाटत असे कि, अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक नांदेड यांनी अवैद्य धंद्यावर कारवाई करणेबाबत सर्व पो.स्टे. प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले होते. त्या अनुषंगाने दि.24 डिसेंबर 2024 रोजी पोलीस स्टेशन कुंडलवाडी व विशेष पथक क्र 04 नांदेड यांनी अवैद्य धंद्याची माहीती काढून केसेस करणे कामी पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान मिळालेल्या गोपनिय माहीतीवरून एक आयचर टेम्पो नांगणी येथुन मांजरा नदीचे पात्रातुन रेती चोरुन धर्माबाद कडे घेवुन जात आहे.
अशी माहीती मिळाल्यावरुन कुंडलवाडी ते धर्माबाद जाणारे रोडवर डौर फाटा येथे छापा मारला असता आयचर टेम्पो क्र MH 19 Z6500 हा अवैद्य रेती वाहतुक करीत असताना मिळुन आला. आरोपी टेम्पो क्र MH 19 2 6500 चा चालक नामे शेख गौस पाशा शेख उस्मान पाशा वय 34 वर्ष व्यवसाय चालक रा.धर्माबाद जि.नांदेड यांच्याकडून 6000 रु चार ब्रास रेती आणि 400000 रु एक अशोक लिलंड 06 चाकी टेम्पो क्र MH 19 2 6500 कि.अ. असं मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गु.र.नं. व कलम मु.र.नं. 219/2024 कलम 303(2) INS महकलम 48 (7).48 (8) महसुन्न जमीन अधिनियम प्रमाणे फिर्यादी रविंद्र सुधाकरराव देशमुख वय 35 वर्ष व्यवसाय नोकरी पो.कॉ.364 नेमणुक पोलीस स्टेशन, कुंडलवाडी ता. बिलोली यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हि कार्यवाही अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक, नांदेड, खंडेराव धरणे, अप्पर पोलीस अधिक्षक, भोकर, सुरज गुरव, अप्पर पोलीस अधिक्षक, नांदेड, प्रशांत संपते, उप विभागीय पोलीस अधिकारी साहेब, धर्माबाद यांचे मार्गदर्शनाखाली भागवत नागरगोजे, सहा. पोलीस निरीक्षक पो.स्टे. कुंडलवाडी, पोहेकों/2821 एस. एल. बव्हाण पो.स्टे. कुंडलवाडी, पो.कॉ.2368 ए.जी. शिंदे पो.स्टे. कुंडलवाडी, पो.कॉ.364 आर.एस. देशमुख पो.स्टे. कुंडलवाडी, पो.कॉ.3176 रंजित मुदिराज विशष पथक क 04 नांदेड, पो.कॉ. 1593 एस. जि. तलबारे विशेष पथक क 04 नांदेड यांनी केली आहे.