नांदेड। नांदेड ग्रामीण गुन्हे नियंत्रण पथकाने गांज्या विक्री करणाऱ्या एका आरोपीस कोठा येथील मेन रोडवर ताब्यात घेतली, या संदर्भात फिर्यादी महेश कोरे, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अविनाश कुमार, पोलीस अधिक्षक साहेब, नांदेड यांनी ऑपरेशन फ्लश आउट अंतर्गत अवैध धंदयाची माहीती फाडुन केसेस करण्याचे सर्व पो.स्टे. प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले होते. त्या अनुषंगाने दिनाक 24/12/2024 रोजी आम्हास गुप्त बातमीदारा मार्फत गुप्त माहिती मिळाली की, पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण हद्दीत मेन गंडवर कीटा येथे एक इसम एन.डी.पी.एस. अंक्ट च्या तरतुदीचा भंग करून त्याचे ताब्यात अंमली पदार्थ गांज्याची विक्री करण्यासाठी बाळगून आहे.
मिळालेल्या गुप्त माहीतीच्या ठिकाणी गुन्हे नियंत्रण पथकातील महेश कोरे पोउपनि व टिमने पंचासह छापा कार्यवाही केली. यावेळी आरोपी लड्डू अशोक कल्याणे वय 47 वर्षे व्यवसाय मजुरी रा. हनुमान मंदिराजवळ, जियागोडा, संजयनगर, हैद्राबाद राज्य तेलंगणा याच्या जवळील एका बंगमध्ये हिरवट रंगाचा पाला, काड्या व वियामिश्रीत उग्र वास येत असलेला अंमली पदार्थ गांजा ज्याचे एकूण वजन 2.6.30 किलो ग्रॅम किंमती 52600/- रुपयाचा मुद्देमाल मिळून आले आहेत. सदरची कामगीरी करणाऱ्या पथकाचे वरिष्ठांनी कौतुक केले आहे. सदर गुन्हयाचा तपास सपोनि मान्टे पो.स्टे. नांदेड ग्रामीण हे करीत आहेत.