नांदेड/देगलूर| तालुक्यात झालेल्या चोरीचे गुन्हा करणाऱ्या आरोपीना अटक करून देगलूर पोलिसांनी तीन चोरीच्या गुन्हे उघडकीस आणून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. याबद्दल सर्व स्तरातून देगलूर पोलिसांचे अभिनंदन केले जात आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अबिनाश कुमार (भा.पो.से), पोलीस अधिक्षक नांदेड, यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत अवैद्य धंद्यावर कार्यवाही करण्याबाबत व मागील गुन्हे उघडकिस आणणे बाबत पोलीस निरीक्षक देगलुर यांना आदेशीत केले होते. त्यानुसार मारोती श्रीराम मुंडे, पोलीस निरीक्षक, पो. ठाणे देगलूर यांनी गुन्हे शोध पथकातील अमंलदार यांना देगलुर शहरातील चोरी करणारे आरोपीतांचा शोध घेणे करीता तात्काळ रवाना केले. गुन्हे शोध पथकातीलअमंलदार यांनी जुने बसस्थानक परिसरातील एस.टी. मध्ये चढत असतांना फिर्यादीचे गळातील सोन्याचे दागीने चोरी करणाऱ्या आरोपीचा गोपनिय माहीतगार नेमुन शोध घेऊन आरोपी नामे विमलबाई प्रकाश जाधव, वय ३० वर्षे रा. बादलगांव तांडा, ता. औराद जि. विदर, चांगुनाबाई सुधाकर राठोड, वय ३५ वर्षे रा. बादलगांव तांडा, ता. औराद जि. बिदर यांना उदगीर रोडने पायी जात असतांना सदर महिलांना ताब्यात घेऊन त्याचेकडुन चोरीस गेलेले सोन्या चांदीचे दागीने किं.अं.२१,०००/- रुपयेचा मुददेमाल हस्तगत करुन उत्कृष्ट कामगीरी केली.
हि कार्यवाही अविनाश कुमार (भा.पो.से), पोलीस अधिक्षक, नांदेड, खंडेराय धरणे (म.पो.से.), अपर पोलीस अधिक्षक, भोकर, सुरज गुरव (म.पो.से.), अपर पोलीस अधिक्षक, नांदेड, संकेत गोसावी (म.पो.से.), उपविभागीय पोलीस अधिकारी, देगलुर यांचे मार्गदर्शनाखाली, मारोती श्रीराम मुंडे, पोलीस निरीक्षक, पो. ठाणे देगलुर, पोना/कृष्णा तलवारे, पोकों/साहेबराव सगरोळीकर, पोकों/वैजनाथमोटरगे, पोकों/सुधाकर मलदोडे, पोकों/राजवंतसिंघ बुंगई आदींनी केली आहे.
दुसऱ्या घटनेत देगलुर शहरातील चोरी करणारे आरोपीतांचा शोध घेत असताना तळगल्ली येथील जनरलस्टोर मधील गल्यातील ठेवलेली रक्कम चोरी करणाऱ्या आरोपीचा गोपनिय माहीतगार नेमुन तसेच CCTV फुटेज च्या मदतीने शोध घेऊन आरोपी अनिल गणपत कावटवार, वय ३० वर्षे रा. गोकुळनगर देगलुर जि. नांदेड यास ताब्यात घेऊन त्याचेकडुन चोरीस गेलेले नगदी ७०००/-रुपयेचा मुददेमाल हस्तगत करुन उत्कृष्ट कामगीरी केली.
तिसऱ्या घटनेत देगलुर शहरातील चोरी करणारे आरोपीतांचा शोध घेणे करीता नविन बसस्थानक परिसरातील एस.टी. कैन्टीन मध्ये चोरी करणाऱ्या आरोपीचा गोपनिय माहीतगार नेमून व नविन बसस्थानक भागातील CCTV कैमेरे व्दारे शोध घेऊन आरोपी नामे शेख ईस्माईल शेख सुलतान, वय ४० वर्षे रा. मोमीन गल्ली, देगलुर यास मोंढा देगलूर भागातून ताब्यात घेऊन त्याचेकडुन चोरीस गेलेले नगदी ६०००/-रुपये व किराणा मालाचे ८००/-रुपये हस्तगत करुन उत्कृष्ट कामगीरी केली.