Police station Degalur arrested : पोलीस स्टेशन देगलुर यांनी आरोपीस अटक करुन चोरीचे तीन गुन्हे केले उघड -NNL
नांदेड/देगलूर| तालुक्यात झालेल्या चोरीचे गुन्हा करणाऱ्या आरोपीना अटक करून देगलूर पोलिसांनी तीन चोरीच्या गुन्हे उघडकीस आणून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. याबद्दल सर्व स्तरातून देगलूर पोलिसांचे अभिनंदन केले जात आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अबिनाश कुमार (भा.पो.से), पोलीस अधिक्षक नांदेड, यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत अवैद्य धंद्यावर कार्यवाही करण्याबाबत व मागील गुन्हे उघडकिस आणणे बाबत पोलीस निरीक्षक देगलुर यांना आदेशीत केले होते. त्यानुसार मारोती श्रीराम मुंडे, पोलीस निरीक्षक, पो. ठाणे देगलूर यांनी गुन्हे शोध पथकातील अमंलदार यांना देगलुर शहरातील चोरी करणारे आरोपीतांचा शोध घेणे करीता तात्काळ रवाना केले. गुन्हे शोध पथकातीलअमंलदार यांनी जुने बसस्थानक परिसरातील एस.टी. मध्ये चढत असतांना फिर्यादीचे गळातील सोन्याचे दागीने चोरी करणाऱ्या आरोपीचा गोपनिय माहीतगार नेमुन शोध घेऊन आरोपी नामे विमलबाई प्...
