HomeनांदेडNanded district in CCTNS system : सीसीटीएनएस प्रणालीत नांदेड जिल्हयाची उत्कृष्ट कामगिरी...

Nanded district in CCTNS system : सीसीटीएनएस प्रणालीत नांदेड जिल्हयाची उत्कृष्ट कामगिरी -NNL

नांदेड| नांदेड जिल्हा पोलीस दलाने महाराष्ट्र राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला सीसीटीएनएस प्रणालीत नांदेड जिल्हा पोलीस दलाची कारकीर्द नेहमीच चर्चेत राहिली आहे. दरम्यान नुकत्याच लागलेल्या सीसीटीएनएस रॅकिंग मध्ये नांदेड जिल्हा पोलीस दलाने राज्यात द्वितीय स्थान पटकावले आहे. यामुळे संपुर्ण राज्यात नांदेड जिल्हयाची मान पुन्हा एकदा उंचावली आहे.

अपर पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य पुणे, यांचे कडुन पोलीस घटकांच्या सीसीटीएनएस कामगिरी बाबतचा आढावा दर महीन्यात घेण्यात येतो राज्यातील सर्व घटकांचे माहे ऑगस्ट 2024 मधील सीसीटीएनएस मासिक कामगिरी अहवालांचे अवलोकन करुन देण्यात आलेल्या गुणांकनानुसार नांदेड जिल्हयाने राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. सीसीटीएनएस कार्य प्रणालीमध्ये नांदेड जिल्यातील 36 पोलीस स्टेशन येथे दाखल होणारे प्रथमखबर,

घटनास्थळ पंचनामे, आरोपी अटक, मालमत्ता जप्ती, दोषारोप पत्र, न्यायालयीन निकाल, हरवलेले इसम, अनओळखी मयत, अदखलपात्र खबर, गहाळ / बेवारस मालमत्ता, प्रतीबंधक कार्यवाही व ईतर नोंदी अश्या एकुण 18 प्रकारच्या माहितीची सीसीटीएनएस कार्यप्रणालीमध्ये मध्ये वेळेत परिपुर्ण नोंदी करण्यात येतात. तसेच सीसीटीएनएस प्रणालीचा दैनदिन कामकाजात वापर करुन गुन्हे प्रतिबंध, गुन्हे उघडकिस आणुन चांगली कामगिरी करण्यात आली तसेच ITSSO, ICJS, Cri-MAC व Citizan Portal वरील e-Complaint, ची वेळेत निर्गती व प्रभावीपणे वापर केल्याने माहे ऑगस्ट 2024 मध्ये नांदेड जिल्हयाने 201 गुणांपैकी 196 गुण मिळवुन महाराष्ट्र राज्यात द्वितीय क्रमांक आला आहे.

मा. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांचे मार्गदर्शनाखाली सीसीटीएनएस नोडल अधिकारी अपर पोलीस अधीक्षक नांदेड सुरज गुरव, अपर पोलीस अधिक्षक भोकर डॉ. के.ए. धरणे व त्यांची सीसीटीएनएस टीम पोलीस उप निरीक्षक सय्यद अनिसा फातेमा, पोलीस हवालदार समीरखान मुनीरखान पठाण, पोलीस कॉन्स्टेबल माधव नारायण येईलवाड यांचे परिश्रमामुळे नांदेड पोलीस दलाने राज्यात द्वितीय क्रमांक मिळविला आहे. त्यासाठी मा. पोलीस अधिक्षक साहेब यांनी सीसीटीएनएस विभागाचे कौतुक केले आहे, तसेच भविष्यातही अशाच कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments