Homeनांदेडउद्योजकांनी मैत्री कक्षाद्वारे उपलब्ध सेवांचा लाभ घ्यावा : जिल्हा उद्योग केंद्र

उद्योजकांनी मैत्री कक्षाद्वारे उपलब्ध सेवांचा लाभ घ्यावा : जिल्हा उद्योग केंद्र

नांदेड l जिल्ह्यातील उद्योजकांनी शासनाच्या मैत्री सहाय्य प्रणालीचा लाभ घ्यावा. यासाठी नोंदणी, सहभाग व लाभाच्या विविध सुविधेबाबत काही अडचण, समस्या असल्यास सल्ला व मार्गदर्शनासाठी महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र उद्योग भवन सहकारी औद्योगिक वसाहत शिवाजीनगर नांदेड येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे.

सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (MSME ) हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. राज्यामध्ये त्यांचे महत्व विशेष आहे. नांदेड जिल्हयात सध्या १ लाख १२९ सुक्ष्म, ७२० लघु व ४१ मध्यम असे नोंदणीकृत उद्योग आहेत.

महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था सन २०२७ पर्यंत १ ट्रिलीयन डॉलर्स पर्यंत पोहंचविण्याचे शासनाचे ध्येय आहे. शासनाच्या या ध्येयपूर्तीसाठी आणि राज्यात उद्योग स्थापनेकरिता उद्योग, व्यापार व सेवाक्षेत्रातील गुंतवणूकदारांना सर्व आवश्यक परवाने, मंजूरी, ना-हरकती, सवलती व तक्रार निवारण या सेवांचा वेगवान, पारदर्शक आणि सुलभपणे लाभ एकाच ठिकाणी देण्यासाठी एक खिडकी प्रणाली म्हणून उद्योग विभागातंर्गत मैत्री (MAITRI – Maharashtra, Trade and Investment Facilitation Cell) कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. त्याद्वारे पुढील सुविधा विविध 14 विभागांच्या 124 सेवा मैत्री 2.0 पोर्टलवर एकात्मिक करुन उपलब्ध करुन दिलेल्या आहेत.

· एक खिडकी अर्ज प्रणाली https://maitri.maharashtra.gov.in

· तक्रार/समस्या निवारण

· हेल्पलाइन मदत कक्ष क्रमांक 18002332033

· गुंतवणूकदारांचा मार्गदर्शक

· प्रोत्साहन गणना

नांदेड जिल्ह्यातील उद्योजकांनी या सेवांचा लाभ घ्यावा जेणेकरून जिल्ह्यात उद्योगांची वाढ होईल व जिल्हयाच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल. जिल्हयातील उद्योग व गुंतवणूकदारांनी मैत्री या सहाय्य प्रणालीचा लाभ घेवून पोर्टलवर सक्रीय सहभाग नोंदवावा.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments