Homeनांदेडशेतकऱ्यांच्या घरातून चितेचा धूर उठत असताना, सरकारला लाज कशी वाटत नाही? -...

शेतकऱ्यांच्या घरातून चितेचा धूर उठत असताना, सरकारला लाज कशी वाटत नाही? – ज्योतिबा खराटे

महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना, पाच हजारांची मदत देऊन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणे बंद करा, सरकार!

श्रीक्षेत्र माहूर, कार्तिक बेहरे| साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेले श्रीक्षेत्र माहूर हे मागील अनेक काळापासून भाविकांच्या गर्दीने कायम ओसांडून वाहत असते. पण यावेळी चित्र वेगळंच आहे. यात्रेनिमित्त नेहमी गजबजलेलं माहूर यावेळी अस्मानी संकटाने आणि दुष्काळामुळे ओस पडलेलं दिसत आहे. मंदिराच्या पायऱ्यांवर नेहमी असणारी रांग, बाजारपेठेतली वर्दळ, सगळं काही वसरलेलं आहे. याचं एकच कारण आहे – बळीराजावर आलेलं महासंकट.

आज महाराष्ट्रातील शेतकरी दुष्काळाने होरपळत आहे. हाताशी आलेली पिके उद्ध्वस्त झाली आहेत. डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे, सावकारांचे तगादे आहेत आणि घरात दिवाळी साजरी करण्यासाठी पैसाही नाही. अशा भयंकर परिस्थितीत पाच हजार रुपयांची मदत जाहीर करून सरकार शेतकऱ्यांची क्रूर थट्टा करत आहे, असा घणाघाती आरोप शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे यांनी केला आहे.

भांडवलदारांना लाखो-कोट्यवधी रुपयांची मदत देण्यासाठी सरकारकडे पैसा आहे; पण जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याला त्याच्या हक्काची नुकसानभरपाई मागितली की केवळ आश्वासनांचे गाजर दाखवले जाते,साहेब, आमच्या शेतकऱ्यांचा दुःखाचा बाजार मांडू नका! आमच्या शेतकऱ्याच्या संकटाचे राजकारण करू नका! त्या बळीराजाला भीक नको, घामाचा आणि कष्टाचा न्याय्य मोबदला हवा! दुष्काळामुळे शेतीची कामे बंद पडली, हाताला काम नाही, घरात अन्न नाही; तरीही शेतमजुरांच्या पदरी पाच हजाराची मदत! हेच का तुमचे संवेदनशील शासन? असा सवालही खराटे यांनी उपस्थित केला.

माहूरच्या यात्रेत येणारा भाविक हा बहुतेक शेतकरी आणि शेतमजूरच असतो. पण यावर्षी खिशात पैसा नाही, घरात धान्य नाही, त्यामुळे देवीच्या दर्शनासाठी येण्याचीही ताकद शेतकऱ्यांमध्ये उरलेली नाही. ज्या माहूरमध्ये लाखोंची गर्दी व्हायची, तिथे आज शुकशुकाट आहे. ही ओसाडी ही फक्त यात्रेची नाही, तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या उध्वस्त झालेल्या संसाराची आहे.शेतकरी आणि शेतमजूर दोघांच्याही जगण्याचा प्रश्न सरकार कधी समजून घेणार? शेतकऱ्यांच्या घरातून चितेचा धूर उठत असताना सरकारला लाज कशी वाटत नाही, असेही खराटे म्हणाले. शेतकऱ्यांना तात्काळ भरीव आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि शेतमजुरांना विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments