HomeनांदेडSanjay Rathod ; दबंग पीआय आहेत म्हणून मृदा व जलसंधारण मंत्री संजय...

Sanjay Rathod ; दबंग पीआय आहेत म्हणून मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांच्यी केली स्तुती

नवीन नांदेड l नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आमदार आनंदराव पाटील बोढारकर यांनी मृदं व जलसंपदा मंत्री संजय राठोड यांच्या कडे स्तुती करत सांगत असतांनाच मंत्री महोदय यांनी ते आमच्या जिल्हा यांचे असल्याचे सांगून त्यांना आमच्या जिल्ह्यात घेऊन जाणार असल्याचे सांगितले. 7 जुन रोजी मंत्री महोदय ना. संजय राठोड यांच्या हस्ते नांदेड मध्ये विविध कार्यक्रमाचे ऊध्दाटन करण्यात आले होते .

दरम्यान आमदार बोंढारकर यांच्या राजगड संपर्क कार्यालया मध्ये भेट दिली असता चर्चा करताना मंत्री महोदय यांनी सांगितले की पोलीस निरीक्षक चिंचोलकर हे माझे गाववाले आहेत, ते एक दबंग पीआय आहेत, त्यांना आमच्या यवतमाळ मध्ये घेऊन जातो त्यावर आ.बोंढारकर म्हणाले की त्यांचे काम खूप चांगले आहे, त्यांच्यासारखे अधिकारी आमच्या ग्रामीणला नांदेड जिल्ह्यामध्ये पाहिजेत, त्यांनी आताच एका आरोपीवर गोळीबार केला आहे.

त्यावर मंत्री बोलत होते की आमच्या जिल्ह्यात गुन्हेगारी वाढलेली आहे आम्हाला चांगले दबंग अधिकारी पाहिजेत आता या खात्यामध्ये पीआय हे दबंग राहिले नाहीत पहिले सारखे,आमच्या वणी येथे कोळसा खाणी आहेत कामगार खूप आहेत चांगले काम करणारे अधिकारी पाहिजे. तेथील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी दबंग अधिकारी आहेत म्हणून त्यांचे काही किस्से मंत्री महोदयांना सांगितले. एकंदर त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल मंत्री महोदय यांनी घेतली आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments