Wednesday, May 13

Tag: and Two-Wheeler

Accident news : पोटा अबादी रस्त्यावर उभ्या ट्रक दुचाकीचा भिषण अपघात

Accident news : पोटा अबादी रस्त्यावर उभ्या ट्रक दुचाकीचा भिषण अपघात

नांदेड, लाइफस्टाइल
आजोबासह नातवाचा जागीच मृत्यू - एकजण गंभीर हिमायतनगर, प्रतिनिधी | भोकर हिमायतनगर महामार्गावर असलेल्या पोटा आबादी जवळ उभ्या असलेल्या ट्रक व दुचाकीचा भिषण अपघात झाला असुन या घटनेत दुचाकी चालक आजोबा व नातवाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.या अपघातातील एकजण गंभीर असलेल्या सहा वर्षीय मुलास उपचारासाठी नांदेड रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.एका चिमुकल्या बालकांचा अपघातात मृत्यू झाला असुन या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. हिमायतनगर तालुक्यातील जवळगाव येथील रहिवासी असलेले बालाजी गंगाराम नाचारे वय (50) आरूष रतन नाचारे, अक्षय माधव शेळके वय 06 हे तिघेजण दुचाकीवर जात असताना भर रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची धडक होऊन मोठा अपघात झाला या घटनेत दुचाकीस्वार बालाजी नाचारे व यांचाच नातू आरूष रतन नाचारे हा जागीच ठार झाला तर एकजण गंभीर जखमी झाला असल्याची माहिती मिळाली सदरील हि घटना पोटा अ...
error: Content is protected !!