HomeनांदेडNarayan Kale : मराठा सेवा संघाच्या तालुकाध्यक्षपदी नारायण काळे यांची निवड

Narayan Kale : मराठा सेवा संघाच्या तालुकाध्यक्षपदी नारायण काळे यांची निवड

हिमायतनगर, उत्कर्ष मदसवार | मराठा सेवा संघ यांच्या हिमायतनगर तालुकाध्यक्षपदी नारायण काळे यांची निवड करण्यात आली आहे. हिमायतनगर येथील विश्रामगृहात आयोजित बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली.

निवडीनंतर बोलताना नारायण काळे यांनी सांगितले की, मराठा सेवा संघाची विचारधारा समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवून प्रत्येक घटकाचे जीवनमान उंचावण्यासाठी ते कार्यरत राहतील. संघटनेने सोपवलेली जबाबदारी पूर्ण विश्वासाने पार पाडणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या बैठकीस मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष, श्री शिंदे, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य श्री शेरा पाटील, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. सतीश जाधव, सहसचिव श्री डाखोरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

तसेच संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष सारंग मीराशे, ग्रामसेवक संघटनेचे सचिव आनंद कदम, डॉ. गफार कार्लेकर, मुना शिंदे, सामाजिक कार्यकर्ते मारोती मिरटकर आदींचीही उपस्थिती होती. निवडीप्रसंगी नारायण काळे यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments