HomeनांदेडDeer Safe ; कलंबरच्या शिवारातील विहिरीत पडलेल्या हारिणास सुखरूप काढले

Deer Safe ; कलंबरच्या शिवारातील विहिरीत पडलेल्या हारिणास सुखरूप काढले

उस्माननगर, माणिक भिसे। लोहा तालुक्यातील मौजे कलंबर बु येथील शिवारात वन्यप्राणी पाण्याच्या शोधात भटकंती करीत आहेत.नुकताच बाबु अण्णा उमाजीराव गोरे यांच्या शेतातील विहीरीमध्ये हारीण पडल्याचे लक्षात येताच गांवकरी व वनविभाग अधिकारी यांनी परिश्रम करून हरिणास बाहेर सुखरूप काढुण जंगलात सोडून दिले.

कलंबर बु परिसरात मागील आठवड्यात अवकाळी पावसामुळे मानवा प्रमाणे वन्यप्राणी देखील भयभीत झाले आहेत. जंगलात पानवटे नसल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शोधात भटकत असतात. हरणाचा कळप सोडून एक हरिण बाबु अण्णा उमाजीराव गोरे यांच्या शेतातील विहीरीमध्ये पडल्याचे दिसून आले.

तयानंतर गावचे माजी सरपंच श्रीधर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील रवि अशोक तुपेकर , संभा नृसिंह कांबळे , साहेबराव भुजंगराव कांबळे , डिगाबर घुगराळे व वनविभागाचे मुंडे , चांदोबा भिसे यांनी परिश्रम करून हरिणास सुखरूप बाहेर काढले.व पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अजय शिवनकर यांनी दवाखान्यात तपासणी करून वनविभागाचे अधिकारी यांच्या ताब्यात देऊन जंगलात सुखरूप सोडण्यात आले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments