हदगाव, शेख चांदपाशा| २ ऑक्टोबर २०१४ ला स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) राज्य सरकारने सुरू केले. उघड्या वरील शौच्यामुळे उत्पन्न होणारी रोगराई यावर प्रतिबंध घालण्यासाठी २ आक्टोबर २०१९ पर्यंत घरोघरी शौचालय उभारुन हागणदारीमुक्त गावयोजना आणली. त्यासाठी प्रचार आणि प्रसार माध्यमां बरोबर गुड मॉर्निंग पथक राबविले. ग्रामीण भागातील लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाची हागणदारी मुक्त योजना होती. मात्र अपेक्षित असलेला प्रतिसाद हदगाव तालुक्यात मिळाला नाही. या बाबतीत माञ जिल्ह्यात अव्वल क्रमांक म्हणून भासविले आणि लोकांच्या हाती पुन्हा लोटा दिसु लागला.
हदगाव शहरात व ग्रामीण काही वर्षापुर्वी गुडमार्निग पथके सक्रिय असल्याची माहीती मिळाली. नादेड जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी ह्यानी गुड मार्निग पथके कार्यान्वित करावी अशी मागणी स्वच्छाता प्रेमी कडुन व्यक्त होतांना दिसुन येत आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात हगणदारी मुक्त योजना नावालाच दिसुन येत आहे. गावात जातांना ही योजना राबविण्यात येते की नाही असा सवाल सुज्ञग्रामस्थाकडुन चर्चिल्या जात आहे. शासनाकडुन शौचालय करिता करिता जो निधी हदगाव तालुक्यात उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. तो निधी लाभर्थी पर्यत पोहचाला आहे की..? नाही असा प्रश्न ही उपस्थित होतांना दिसुन येत आहे.
कारण की हदगाव तालुक्यात बहुसंख्य गावा मध्ये जातांना येतांना नागरिकासह शालेय विद्यार्थी यांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. या पासुन सुरक्षा व्हावी याकरिता शासनाने दिलेल्या निधीच पुरेपुर लाभ कोणी घेतला. या बाबतीत माञ’ सस्पेंस ‘ वाढत आहे. घरकुलासोबत शौचालय बाधण्याकरिता अदाजे 25 ते ३० हजारच निधी देण्यात आला होता. यातून अनेकांनी जुनी शौचालये खाऊन निधी उचल केला तर काहींनी संबंधित गावच्या ग्रामसेवकाच्या संगनमताने थातुर माथूर बांधकाम करून शासनाला चुना लावला आहे.
गुडमार्निग पथक कार्यान्वित नाही – गटविकास अधिकारी
हदगाव ग्रामीण भागात गुडमार्निग पथक अनेक वर्षापासुन सक्रीय नसल्याची माहीती हदगाव प.स.चे गटविकास अधिकारी कैलास बळवंत यांनी यांनी दिली. हदगाव तालुक्यात 125 ग्रामपंचायती असुन, 178 गावे आहे. आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची ही योजना आहे. परंतु काही नागरिक शौचालय व्यतिरिक्त उघड्यावरच प्रातंविधीसाठी जात असल्याचे दिसुन येते. अशी कबुली ही गटविकास आधिकारी यांनी नांदेड न्यूज लाइव्हच्या प्रतिनिधीला दिलेली आहे.