Thirteen of Hagandari Mukti in Hadgaon Taluka : हदगाव तालुक्यात हागणदारीमुक्तीचे तीनतेरा ; अनेक वर्षापासून गुडमार्निग पथक गायब -NNL
हदगाव, शेख चांदपाशा| २ ऑक्टोबर २०१४ ला स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) राज्य सरकारने सुरू केले. उघड्या वरील शौच्यामुळे उत्पन्न होणारी रोगराई यावर प्रतिबंध घालण्यासाठी २ आक्टोबर २०१९ पर्यंत घरोघरी शौचालय उभारुन हागणदारीमुक्त गावयोजना आणली. त्यासाठी प्रचार आणि प्रसार माध्यमां बरोबर गुड मॉर्निंग पथक राबविले. ग्रामीण भागातील लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाची हागणदारी मुक्त योजना होती. मात्र अपेक्षित असलेला प्रतिसाद हदगाव तालुक्यात मिळाला नाही. या बाबतीत माञ जिल्ह्यात अव्वल क्रमांक म्हणून भासविले आणि लोकांच्या हाती पुन्हा लोटा दिसु लागला.
हदगाव शहरात व ग्रामीण काही वर्षापुर्वी गुडमार्निग पथके सक्रिय असल्याची माहीती मिळाली. नादेड जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी ह्यानी गुड मार्निग पथके कार्यान्वित करावी अशी मागणी स्वच्छाता प्रेमी कडुन व्यक्त होतांना दिसुन येत आहे. तालुक्यातील ग्रामीण भागा...
