Homeधार्मिकShri Parmeshwar Temple : श्रावण महिन्यात भाविकांच्या सुविधांसाठी श्री परमेश्वर मंदिर समितीची...

Shri Parmeshwar Temple : श्रावण महिन्यात भाविकांच्या सुविधांसाठी श्री परमेश्वर मंदिर समितीची आढावा बैठक

मंदिर समितीच्या पदसिद्ध अध्यक्षा तथा तहसीलदार सौ. पल्लवी टेमकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न   गर्दी नियंत्रणासह पार्किंग, पाणी, वीज, स्वच्छता आणि सुरक्षेचा बैठकीत आढावा

हिमायतनगर, प्रतिनिधी | हिमायतनगर येथील जागृत देवस्थान श्री परमेश्वर मंदिरात श्रावण मासानिमित्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी सुलभ दर्शन व्यवस्था, वाहतूक नियोजन, स्वच्छता तसेच इतर मूलभूत सुविधांचा आढावा घेण्यासाठी सोमवार, दि. ११ ऑगस्ट रोजी मंदिर समितीची बैठक घेण्यात आली.
श्री परमेश्वर मंदिर समितीच्या पदसिद्ध अध्यक्षा तथा तहसीलदार सौ. पल्लवी टेमकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली. यावेळी मंदिराचे उपाध्यक्ष महावीरसेठ श्रीश्रीमाळ, सचिव अनंता देवकते, पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, नगरपंचायत मुख्याधिकारी समाधान मासाळ, बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी श्री. दुबे, श्री परमेश्वर मंदिराचे  संचालक प्रकाश शिंदे, प्रकाश कोमावार, मथुराबाई भोयर, लताताई मुलंगे, लताबाई पाध्ये, एड दिलीप राठोड, अनिल मादसवार, संजय माने, विलास वानखेडे, गजानन मुत्तलवाड, आदिसह मंदिराचे लिपिक बाबुराव भोयर गुरुजी, महावितरणचे परमेश्वर शिंदे, शिक्षण विभागाचे एम. जी. टेम्भूर्णीकर, नगरपंचायत विभागाचे विठ्ठल शिंदे, बालाजी हार्डपकर, मंदिर समितीचे कर्मचारी विविध विभागांचे संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
बैठकीत श्रावण महिन्यात मंदिरात वाढणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन दर्शन रांगेचे नियोजन, वाहतूक व्यवस्था, पार्किंग, मंदिर परिसरातील स्वच्छता, पिण्याचे पाणी, वीज व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था तसेच भाविकांना आवश्यक असलेल्या इतर सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित विभागांनी आपापल्या जबाबदाऱ्या योग्य पद्धतीने पार पाडाव्यात, अशा सूचना यावेळी तहसीलदार सौ. पल्लवी टेमकर यांच्या वतीने करण्यात आले.
IMG 20260810 213610 Shri Parmeshwar Temple : श्रावण महिन्यात भाविकांच्या सुविधांसाठी श्री परमेश्वर मंदिर समितीची आढावा बैठक
Oplus_16908320
हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिर हे धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे देवस्थान असून, येथे हरिहराच्या रूपातील श्री परमेश्वराची उभी मूर्ती असल्याचे सांगितले जाते. नवसाला पावणारा परमेश्वर म्हणून या देवस्थानाची सर्वदूर ख्याती आहे. त्यामुळे महाशिवरात्र तसेच श्रावण महिन्यात महाराष्ट्रासह विविध भागांतून भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. श्रावण महिन्यातील धार्मिक उत्सव शांततेत, शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात पार पडावा, यासाठी प्रशासन, मंदिर समिती, विविध विभाग तसेच नागरिक-भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार तथा मंदिर समितीच्या अध्यक्षा सौ. पल्लवी टेमकर यांनी केले.
NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments