HomeकृषीShugarcane Crop : हदगाव तालुक्यातील ऊस पिकावर पांढऱ्या माशीचा हल्ला हजारो हेक्टरवरील...

Shugarcane Crop : हदगाव तालुक्यातील ऊस पिकावर पांढऱ्या माशीचा हल्ला हजारो हेक्टरवरील पीक संकटात…!

हदगांव, शेख चांदपाशा| हदगाव तालुक्यातील ऊस पिकांवर सध्या पायरेलिया (पांढरी माशी) किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून हजारो हेक्टर क्षेत्रातील ऊस धोक्याच्या टोकावर पोहोचला आहे. तज्ज्ञांच्या मते, या कीड नियंत्रणात न आणल्यास ६० ते ७० टक्के नुकसान होण्याची शक्यता आहे.
तालुक्यातील हरडफ, धोतरा, हडसणी, बणचिंचोली, गुरफळी, बाभळी, कोथळा, गोरलेगाव, वाकोडा, गोजेगाव आणि पैनगंगा नदी किनारी असलेल्या गावांतील ऊस पीक प्रचंड प्रमाणात रोगग्रस्त झाले आहे. खोडवा ऊस पिकामध्ये विशेषतः मोठ्या प्रमाणात हानी झाल्याचे दिसून आले आहे.
पांढऱ्या माशीची पिल्ले ऊसाच्या पानाच्या खालच्या बाजूस लपून बसतात व पाने शोषून त्यातील हरितद्रव्य नष्ट करतात. परिणामी पाने लालसर होत असूनअन्ननिर्मिती प्रक्रिया थांबते आणि उसाची वाढ थांबते.
IMG 20250716 164423 Shugarcane Crop : हदगाव तालुक्यातील ऊस पिकावर पांढऱ्या माशीचा हल्ला हजारो हेक्टरवरील पीक संकटात...!
ऊसाची उंच वाढ झाल्याने पारंपरिक पद्धतीने माणसाच्या सहाय्याने फवारणी करणे अशक्य झाले आहे. परिणामी, ड्रोनद्वारे फवारणी हाच एकमेव पर्याय उरला असताना तालुक्यात अद्याप एकही ड्रोन उपलब्ध नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.
या पार्श्वभूमीवर कापूस संशोधन केंद्र, नांदेडचे कीटकशास्त्रज्ञ डॉ. बसवराज भेदे, कृषी विज्ञान केंद्र पोखरणीचे डॉ. माणिक कल्याणकर आणि हदगाव तालुका कृषी अधिकारी  पाटील यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत प्रभावी नियंत्रण उपायांची माहिती दिली.शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रशासन व कृषी विभागाने तातडीने पावले उचलण्याची गरज आहे, अन्यथा ऊस उत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments