श्रीक्षेत्र माहूर राज ठाकूर l तालुक्यातील वाई बाजार येथे गोड कलाल तेलंग समाजाचा वधू वर परिचय मेळावा दिनांक ८ डिसेंबर रोजी व्यंकट प्रभू लोन येथे संपन्न होणार आहे या मेळाव्यात महाराष्ट्रातून तेलंगाना,कर्नाटक,येथील उपवर वधू यांनी उपस्थित राहावे असे आवाहन किनवट माहूर तालुक्याचे कलाल समाजाचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाने कळवली आहे.
महाराष्ट्रात तसेच इतर राज्यांमध्ये कलाल समाज हा विखुरलेला असून गाव तिथे दोन-तीन घर असा समाज आहे या समाजाचा मुख्य व्यवसाय दारू विक्री तसेच उत्पादन करणे हा असून अनेक राज्यांमध्ये दिसून येतो हा कलाल समाज बांधव असंघटित असून त्यांना एकत्रित करण्याकरिता या परिचय मेळावाचे आयोजन करण्यात आलेला आहे कलाल समाजामध्ये कोण कुठे आणि कसा उपवर वधू यांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने समाजाचे एकत्रीकरण व्हावे वधू-वरांचा परिचय होऊन यातून सोयरीका जुळाव्यात व ते सोयीस्कर जाईल ह्या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
ह्या मेळाव्याचे अध्यक्ष नितीन पाटील कन्नलवार, उपाध्यक्ष नंदकिशोर सिद्धेश्वर, सचिव संजय मुरगुलवार, सहसचिव प्रफुल कर्नलवार, कोषाध्यक्ष गजानन रामराव पडलवार, कार्यकारी अध्यक्ष विष्णू पडलवार, हे राहणार असून या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर बालाजी तेलंग किनवट डॉक्टर राजेश पडलवार पारवा, शेषराव अनंतवार हे राहणार असून उद्घाटक उद्धव बंपरवार माजी नायब तहसीलदार किनवट तर स्वागतध्यक्ष विजय कन्नलवार किनवट, रवींद्र मारकवार माहूर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहे तेंव्हा समस्त कलाल गौड तेलंग समाजातील बांधवांनी आपल्या उपवर वधू वर यांना घेऊन व त्यांचा बायोडाटा पाठवून नाव नोंदणी करावी असे आवाहन आयोजक सचिन पडलवार मनोज पाटील कन्नलवार यांनी केले आहे