नांदेड l माहूर तालुक्यातील मौजे वझरा शेख फरीद येथील अनुसूचित जाती पैकी असलेल्या चंद्रकांतने १८ ऑक्टोबर रोजी माहूर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध ऍट्रॉसिटी ऍक्ट व इतर कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.
घटनेचे गांभीर्य गंभीर असल्यामुळे फिर्यादीने घडलेला प्रकार थेट पोलीस अधीक्षक श्री अबीनाश कुमार यांच्या निदर्शनास आणून दिला. किंबहुना पोलीस अधीक्षक कार्यालयात लेखी अर्ज करून पोच पावती देखील मिळविली.
फिर्याद जाती अत्याचार व पत्नीच्या मोबाईल कॉल रेकॉर्डिंग व सीसीटीव्ही फुटेज तपासणी संदर्भात असल्यामुळे पोलीस अधीक्षक यांच्या निर्देशाने माहूर पोलीस स्थानकात थेट गुन्हा दाखल करण्यात आला.
काही कारणास्तव गुन्हा दाखल होण्यासाठी दोन आठवडे लागलेत. तपास सुरु होता पंधरावाडा संपलातरी आरोपी पोलिसांना सापडले नाहीत.
शेवटी नांदेडच्या निष्णात वकील महोदयानी आरोपीना अटकपूर्व जमीन मिळवून दिला व फिर्यादीच्या वकिलाने अर्जात जे म्हणणे मांडायला पाहिजे होते ते मांडलेच नाही ही शोकांतिका आहे असे फिर्यादीचे मत झाले आहे.
एकदाचे आरोपीचे व आरोपीना सहकार्य करणाऱ्या गावातील ११० लोकांचे समाधान झाले.अर्थातच गावातील ११० लोकांनी फिर्यादी व कुटुंबियांवर बहिष्कार टाकला असून त्यांचा शोध घेऊन कारवाई करणे आवश्यक आहे. पीडिताच्या (दलित) विरोधात वझरा येथील ११० गावाकऱ्यांनी सह्या देऊन सवर्ण आरोपी यांच्या बाजूने अर्ज करून एक प्रकारे बहिष्कार टाकल्याचा व फिर्यादीवर तसेच त्याच्या कुटुंबियांवर दबाव टाकण्याचा प्रकार वझरा येथे घडत आहे.
प्रकरण थोडे वेगळे आहे परंतु गावात आमच्या कुटुंबातील व्यक्ती बद्दल सातत्याने खालच्या स्तरावरील चर्चा सुरु असल्यामुळे खुलासा करणे आवश्यक आहे असे फिर्यादी चंद्रकांत लोखंडे यांनी सांगितले.
फिर्यादी हा एक सुशिक्षित बेकार असून नोकरी नसल्याने बँड पथकात वाजंत्री म्हणून काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. काही महिन्यापूर्वी त्याच्या वडिलांचा कॅन्सर मुळे मृत्यू झाला.
वडिलांना घेऊन तो नागपूर,मुंबई,छत्रपती संभाजी नगर, नांदेड आणि आदिलाबाद आदी ठिकाणी वर्षभर फिरत होता. तो एकुलता एक असल्यामुळे त्याच्यावर कुटुंबाच्या सर्वच जबाबदाऱ्या आहेत. तो वडिलांना घेऊन दीड वर्ष वेगवेगळ्या दवाखान्यात भटकंती करीत असताना, त्याच्या पत्नीचे सूत गावातील दोन सवर्ण असलेल्या मुलासोबत जुळले. त्याच्यासोबत पत्नी नेहमीच सूडद्बुद्धीने व वेगळ्या पद्धतीने वागत असे.
त्याला संशय आल्याने स्वतःच्या मोबाईल मधील कॉल रेकॉर्ड तपासले तेव्हा सोबत राहणाऱ्या मित्रांना पत्नीने बोललेल्या अनेक धक्कादायक कॉल रेकॉर्डिंग मिळाल्या त्या ऐकून त्यास धक्काच बसला. सर्व हकीकत त्याने नातेवाईकांना सांगितली, त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न झाला परंतु त्याची मनस्थिती खुप बदलेली होती. तो प्रचंड तनावाखाली होता. सर्व रेकॉर्डिंग पोलीस अधीक्षकांना पाठवून मागील दीड वर्षांचा सीडीआर आणि दवाखान्यात ऍडमिट असतानाचे सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज तपासण्याची मागणी त्याने केली.
जवळचे मित्रच दगाबाज निघालेत हे मनाला खटकणारे होते. पोलीस अधीक्षक यांच्या निर्देशानुसार आरोपी विजय उमाजी केंद्रे आणि सतीश तानाजी सूर्यवंशी यांच्यावर अट्रॉसिटी व इतर कलमानव्ये माहूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले परंतु अटकपुर्व जामीन होईपर्यंत अरोपी मोकाट होते किंबहुना पोलिसांना भेटले नाहीत.
वझरा येथे आरोपीच्या जातीची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्यांच्याकडून फिर्यादी व त्याच्या नातेवाईकांची प्रचंड बदनामी गावात केली जात आहे.
अरोपी कडून ७५ हजार रुपये फिर्यादी व त्याच्या नातेवाईकांनी घेतल्याची चर्चा गावात आणि परिसरात केली जात असून अशी बदमाशकी करून बदनामी करणाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी ही मागणी समोर आली आहे.
फिर्यादी सह माहूर पोलिसांची देखील मोठ्या प्रमाणात बदनामी करण्यात येत असून पोलिसांनी ५० हजार रुपये घेतल्यामुळे आरोपीना अभय दिले होते व अटकपूर्व जामीन मिळेपर्यंत आरोपी पोलिसांना भेटले नाहीत असे खुलेआम गावातील लोक बोलत आहेत.याची देखील चौकशी होणे गरजेचे आहे.
कुणी आणि कोणाला ७५ हजार रुपये दिलेत याचा तपास व्हावा, माहूर ग्रामीण रुग्णालयात सप्टेंबर महिन्यात फिर्यादीची पत्नी ऍडमिट असताना आरोपीने तीला दवाखान्या बाहेर बोलावून काय केले याचा तपास होणे आवश्यक आहे. तसेच दोन्ही आरोपी नेहमीच फोनवर बोलत होते मागील दीड वर्षांचा मोबाईल कॉल रेकॉर्ड डिटेल्स तपासावा कारण आरोपीनी फिर्यादीचा आणि त्याच्या आईचा घातपात करण्याची योजना आखली असावी असा संशय असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तपास करावा ही मागणी घेऊन फिर्यादी चंद्रकांत हा जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर उपोषणास बसला आहे.
डीवायएसपी साहेबांची अजून भेट देखील झाली नाही.
एसपी साहेबाना दिलेल्या अर्जातील म्हणण्या प्रमाणे कारवाई व्हावी ही माफक अपेक्षा चळवळीचा वारसा असलेल्या कुटुंबातील सदस्य असल्यामुळे शांत राहू शकत नाही असे उपोषणार्थीचे म्हणणे आहे.
गावातील सरपंच देखील राहशील गावात तर येशील डावात असे टोमणे मारत असून गावात मोठ्या संख्येने प्रेमळ आणि प्रांजळ लोकं असल्यामुळे अनेक अंतरजातीय विवाह झाले आहेत. परंतु सात दिवस उपोषण झाले, जोपर्यंत योग्य कारवाई होणार नाही तोपर्यंत उपोषण संपणार नाही. सुरु असलेल्या आमरण उपोषणात बदल करून कुटुंबियांना घेऊन साखळी उपोषण करणार असल्याचे लोखंडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
तातडीने आरोपीना अटक करावी, सीडीआर आणि सीसीटीव्ही फुटेज तपासावेत, घातपात करणार आहेत काय, पोलिसांना व फिर्यादीला किती पैसे दिलेले आहेत. कुठे दिले आहेत व कुणाच्या हाताने दिले आहेत याची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत योग्य चौकशी करून कठोरात कठोर कारवाई करावी व्हावी एवढीच माफक अपेक्षा आहे नाहीतर भविष्यात खोट्या केसेस जीवघेणा हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
असे अट्रॉसिटी मधील पीडित अर्जदार लोखंडे यांचे म्हणणे आहे.दि.२७ नोव्हेंबर पासून उपोषण सुरु असून सध्यस्थीतीत साखळी उपोषण सुरु करण्यात आले आहे.