Chandrakant Lokhande ; अट्रॉसिटी मधील उदासीनता व आरोपी पोलिसांना सापडले नसल्याचे कोडे ; फिर्यादी फितूर होत नसतात तर फितूर होणारे दुसरेच असतात – फिर्यादी चंद्रकांत लोखंडे – NNL
नांदेड l माहूर तालुक्यातील मौजे वझरा शेख फरीद येथील अनुसूचित जाती पैकी असलेल्या चंद्रकांतने १८ ऑक्टोबर रोजी माहूर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध ऍट्रॉसिटी ऍक्ट व इतर कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.
घटनेचे गांभीर्य गंभीर असल्यामुळे फिर्यादीने घडलेला प्रकार थेट पोलीस अधीक्षक श्री अबीनाश कुमार यांच्या निदर्शनास आणून दिला. किंबहुना पोलीस अधीक्षक कार्यालयात लेखी अर्ज करून पोच पावती देखील मिळविली.
फिर्याद जाती अत्याचार व पत्नीच्या मोबाईल कॉल रेकॉर्डिंग व सीसीटीव्ही फुटेज तपासणी संदर्भात असल्यामुळे पोलीस अधीक्षक यांच्या निर्देशाने माहूर पोलीस स्थानकात थेट गुन्हा दाखल करण्यात आला.
काही कारणास्तव गुन्हा दाखल होण्यासाठी दोन आठवडे लागलेत. तपास सुरु होता पंधरावाडा संपलातरी आरोपी पोलिसांना सापडले नाहीत.
शेवटी नांदेडच्या निष्णात वकील महोदयानी आरोपीना अटकपूर्व जमीन मिळवून दिला व फिर्यादीच्या वकिलान...
