HomeनांदेडGujarati High School | गुजराती हायस्कूल नांदेड मध्ये कलाविष्कार- सुपर सॅटर्डेचे थाटात...

Gujarati High School | गुजराती हायस्कूल नांदेड मध्ये कलाविष्कार- सुपर सॅटर्डेचे थाटात उद्घाटन -NNL

नांदेड| कलाविष्कार SUPER SATURDAY -Students Activity Day..A Stressless and Bagless Day…या उपक्रमांतर्गत आज दि. 20 जुलै 2014 शनिवार रोजी इयत्ता 8 वा ई वर्गाचा कलाविष्कार सुपर सेटर्डे ॲक्टिविटी डे होता यामध्ये सर्वप्रथम 8 वा ई च्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर अस्खलित इग्रजी मध्ये परिपाठ सादर केला.

यासाठी त्यांचे वर्गशिक्षक बिच्चेवार सर यांनी त्यांना मार्गदर्शन केले. तत्पूर्वी शैक्षणिक वर्ष 2024-25 च्या Super Saturday, या कार्यक्रमाचे उद्घाटन गुजराती हायस्कूलचे मुख्याधापक श्री सुमठाणकर सर, उपमुख्याधिका सौ.मेघा जोशी मॅडम , सहाय्यक पर्यवेक्षक बालाजी हुलकाने सर, कार्यालयीन अधीक्षक चौहान सर यांनी सरस्वती पूजनाने केले.

मुख्याधापक यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले व त्यांचे प्रोत्साहन वाढवले. यानंतर प्राथमिक शाळेचे शिक्षक-योगगुरु श्री कोलपेवाड सर यांनी विद्यार्थ्यांना योगाचे तसेच ध्यान एकत्रित करण्याचे प्रशिक्षण दिले. कार्यक्रमाच्या पुढील भागात विद्यार्थ्यांनी आपल्यामध्ये असलेल्या विविध कलागुनांचा आविष्कार सादर केला..जसे नृत्य,संगीत,गायन, भारूड,तबला, गिटार,भाषण, चित्रकला, संभाषण, कराटे, जिम्नास्टिक आदी अतिशय उत्स्फूर्तपणे सर्वांसमोर सादर केले.

मध्यंतरानंतर नांदेडचे सुप्रसिद्ध बाल मानसोपचार तज्ञ डॉ. रामेश्वर बोले सर (मनदर्पण हॉस्पिटल,नांदेड) यांची प्रमुख उपस्थिती लाभली तसेच त्यानी विद्यार्थ्यांना मोबाईल वापराचे शरीरावर होणारे दुष्परिणाम, लाँग टर्म मेमरी साठी काय करायला हवे तसेच फिजिकल एक्सर्साइज़ यासंबंधी विद्यार्थांना PPT द्वारे प्रोजेक्टर वर विशेष मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन ब्याळे सर व हुलकाने सर यांनी केले. तसेच 8 वी च्या सर्व शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. बालाजी सर व ब्याळे सर यांनी कार्यक्रमाचे विशेष क्षणचित्र आपल्या कॅमेऱ्यात टिपले..

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments