HomeकृषीDamage Rabi Crop's : वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा; रब्बी पिके व...

Damage Rabi Crop’s : वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा; रब्बी पिके व फळबागांचे मोठे नुकसान

हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यासह परिसरात सोमवारी मध्यरात्री अचानक सुरू झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. रब्बी हंगामातील गहू व हरभरा ही पिके पावसाच्या तडाख्यामुळे आडवी पडली असून अनेक ठिकाणी शेतात पाणी साचल्याने पिकांची अवस्था बिकट झाली आहे.

अनेक शेतकऱ्यांनी कापून शेतात व खळ्यावर ठेवलेला हरभरा भिजल्याने त्याचेही मोठे नुकसान झाले आहे. तसेच फळबागांनाही वादळी वाऱ्याचा फटका बसला असून काही ठिकाणी फळगळ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

IMG20260223092652 01 Damage Rabi Crop's : वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा; रब्बी पिके व फळबागांचे मोठे नुकसान
oplus_32

दरवर्षीप्रमाणे यंदाही अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना फटका दिला आहे. यापूर्वी खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आधीच नुकसानीत होता. रब्बी हंगामातील उत्पादनातून नुकसान भरून निघेल, अशी अपेक्षा असतानाच हाता-तोंडाशी आलेल्या गहू, हरभरा व फळबागांवर अस्मानी संकट कोसळल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे.

IMG20260223092825 scaled Damage Rabi Crop's : वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा; रब्बी पिके व फळबागांचे मोठे नुकसान
oplus_2097152

या अवकाळी पावसाच्या फाटक्याचे तत्काळ पंचनामे करून शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. कृषी व महसूल विभागाने तातडीने पाहणी करून वस्तुस्थितीचा अहवाल सादर करावा, अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments