HomeनांदेडMp Ashok chavan ; माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांना खा. अशोक...

Mp Ashok chavan ; माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांना खा. अशोक चव्हाण यांनी वाहिली भावपुर्ण श्रद्धांजली -NNL

नांदेड। माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे भारताचे राजकारण व अर्थकारणावर अमिट छाप सोडणारा एक थोर मुत्सद्दी, एक अर्थशास्त्री काळाच्या पडद्याआड गेला आहे. भारताच्या आर्थिक उदारीकरण प्रकियेत त्यांचा सिंहाचा वाटा होता. देशाचे अर्थमंत्री व पंतप्रधान म्हणून त्यांनी अर्थव्यवस्थेतील आमुलाग्र बदलांसह माहितीचा अधिकार कायदा व ‘मनरेगा’ सारखे महत्वपूर्ण निर्णय घेतले.

दिवंगत माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांच्या कार्यकाळात डॉ. शंकरराव चव्हाण व डॉ. मनमोहन सिंग दोघेही मंत्री होते. तेव्हापासून त्यांच्याशी माझा परिचय होता. अनेकदा आमचा संवाद होत असे. मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रासाठी त्यांनी भरभरून मदत केली.

गुरुता गद्दी सोहळ्याचे आयोजन करताना त्यांनी नांदेडमधील पायाभूत सुविधांसाठी दाखवलेली सकारात्मकता व केलेली भरीव मदत मी कधीही विसरू शकणार नाही. त्यांच्याविषयी माझ्या मनात नेहमीच आदराचे एक वेगळे स्थान होते व ते कायम राहिल. दिवंगत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचे निधन माझ्यासाठी व्यक्तीगत हानी आहे. अश्या शब्दात खा. अशोक चव्हाण यांनी भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments