Tuesday, May 26

Tag: Unseasonal rains accompanied

Damage Rabi Crop’s : वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा; रब्बी पिके व फळबागांचे मोठे नुकसान

Damage Rabi Crop’s : वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा; रब्बी पिके व फळबागांचे मोठे नुकसान

कृषी, नांदेड, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यासह परिसरात सोमवारी मध्यरात्री अचानक सुरू झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. रब्बी हंगामातील गहू व हरभरा ही पिके पावसाच्या तडाख्यामुळे आडवी पडली असून अनेक ठिकाणी शेतात पाणी साचल्याने पिकांची अवस्था बिकट झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी कापून शेतात व खळ्यावर ठेवलेला हरभरा भिजल्याने त्याचेही मोठे नुकसान झाले आहे. तसेच फळबागांनाही वादळी वाऱ्याचा फटका बसला असून काही ठिकाणी फळगळ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना फटका दिला आहे. यापूर्वी खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आधीच नुकसानीत होता. रब्बी हंगामातील उत्पादनातून नुकसान भरून निघेल, अशी अपेक्षा असतानाच हाता-तोंडाशी आलेल्या गहू, हरभरा व फळबागांवर अस्मानी संकट कोसळल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत स...
error: Content is protected !!