Homeनांदेडपहिली घंटा : चिमुकल्यांच्या किलबिलने गजबजल्या शाळा;  कुठे हसू, तर कुठे आसू;...

पहिली घंटा : चिमुकल्यांच्या किलबिलने गजबजल्या शाळा;  कुठे हसू, तर कुठे आसू; शाळांमध्ये प्रवेशोत्सवाची धूम -NNL

श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। आज १५ जुन रोजी तालुक्यातील शाळांची पहिली घंटा वाजली. आजच्या पहिल्या घंटाने उन्हाळयाच्या सुट्यानंतर विद्यार्थ्यांच्या किलबिलने शाळा गजबजल्या. शिक्षक वुद शालेय व्यवस्थापन समिति सदस्यानी विद्यार्थ्यांचे पुष्प देवून स्वागत केले. त्यांनी चिमुकल्यांशी संवाद साधला. आजच्या पहिली घंटा वाजवून शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली.

१५ एप्रिल पासून सुरू झालेली उन्हाळ्याची दिर्घ सुट्टी संपून १५ जुन रोजी तालूक्यातील ११केंद्रातील १४१ शाळेचीं पहिली घंटा वाजली. शिक्षकांसह शालेय व्य, समितीतील पदाधिकाऱ्यांनी शाळेत पाऊल ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन, तर काही शाळेत बँड पथकाच्या निनादात स्वागत केले. अनेक शाळा सुशोभित करण्यात आल्या होत्या. मुलांना शाळेत सोडण्यासाठी आलेल्या पालकांची शाळांच्या परिसरात गर्दी झाली होती.

IMG 20240615 WA0029 पहिली घंटा : चिमुकल्यांच्या किलबिलने गजबजल्या शाळा;  कुठे हसू, तर कुठे आसू; शाळांमध्ये प्रवेशोत्सवाची धूम -NNL

अनेक विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिलाच दिवस असल्याने थोडा वेळ का होईना पण आई-बाबांपासून दूर राहायचे या कल्पनेने या मुलांना रडू कोसळले होते, तर काही मुले नवीन मित्रांशी गट्टी जमवितांना दिसली. सकाळी सात वाजल्यापासून रस्त्यावरून शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या रिक्षा धावू लागल्या होत्या. विद्यार्थीही रिक्षावाल्या मामाची वाट पाहत, सकाळीच तयारी करून घराबाहेर उभे होते.

बऱ्याच दिवसांनंतर जुने मित्र भेटल्याचा आनंद मुलांमध्ये होता. माहूर शहरातील जिल्हा परीषद केन्द्रीय प्राथमिक शाळेमध्ये शालेय व्यवस्थापन समिति अध्यक्ष अपिल बेलखोडे, मुख्याध्यापक एस.बि. वाठोरे, डी.बी. उघडे, ए.आर. गोलार,एल. पि. कुलकर्णी मॅडम, यानी उपस्थित विद्यार्थी ना पुस्तक वाटप केले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments