पहिली घंटा : चिमुकल्यांच्या किलबिलने गजबजल्या शाळा; कुठे हसू, तर कुठे आसू; शाळांमध्ये प्रवेशोत्सवाची धूम -NNL
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। आज १५ जुन रोजी तालुक्यातील शाळांची पहिली घंटा वाजली. आजच्या पहिल्या घंटाने उन्हाळयाच्या सुट्यानंतर विद्यार्थ्यांच्या किलबिलने शाळा गजबजल्या. शिक्षक वुद शालेय व्यवस्थापन समिति सदस्यानी विद्यार्थ्यांचे पुष्प देवून स्वागत केले. त्यांनी चिमुकल्यांशी संवाद साधला. आजच्या पहिली घंटा वाजवून शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली.
१५ एप्रिल पासून सुरू झालेली उन्हाळ्याची दिर्घ सुट्टी संपून १५ जुन रोजी तालूक्यातील ११केंद्रातील १४१ शाळेचीं पहिली घंटा वाजली. शिक्षकांसह शालेय व्य, समितीतील पदाधिकाऱ्यांनी शाळेत पाऊल ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन, तर काही शाळेत बँड पथकाच्या निनादात स्वागत केले. अनेक शाळा सुशोभित करण्यात आल्या होत्या. मुलांना शाळेत सोडण्यासाठी आलेल्या पालकांची शाळांच्या परिसरात गर्दी झाली होती.
अनेक विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिलाच दिवस असल्याने थोड...
