Homeक्राईमAccident : दुचाकीच्या अपघातात तरुण जागीच ठार; फुलवळ येथील पुलानजिकची घटना

Accident : दुचाकीच्या अपघातात तरुण जागीच ठार; फुलवळ येथील पुलानजिकची घटना

कंधार,सचिन मोरे| कंधारकडून दुचाकीवरून सासरवाडी पेठवडज येथे आपल्या पत्नीस भेटण्यासाठी जाणाऱ्या दुचाकीस्वराचा कंधार तालुक्यातील फुलवळ येथील पुलानजीक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० वर अपघात होऊन जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दिनांक ३० जुलै रोज गुरुवारी दुपारी ३:०० वाजताचे सुमारास घडली असल्यामुळे नगारवाडीसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

घटनेची थोडक्यात वृत्त असे लोहा तालुक्यातील नगारवाडी येथील रहिवासी सचिन रावसाहेब येटलवाड वय २७ वर्षे व्यवसाय ऊसतोड कामगार हे दिनांक ३० जुलै २०२६ रोज गुरुवारी आपल्या दुचाकी क्रमांक एम एच १४ ईव्ही १९१३ वरून पत्नीला भेटण्यासाठी सासुरवाडी पेठवडज कडे जात असताना फुलवळ येथील पुलाजवळ सदरच्या दुचाकीचा अपघात होऊन दुचाकीस्वार सचिन रावसाहेब येटलवाड यांचा जागीच मृत्यू झाला असल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

सदरच्या अपघाताबाबत कंधार पोलीस ठाण्यात भ्रमणध्वनी वरून माहिती दिली असता, घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक अरविंद घोडके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बालाजी गारोळे, सुनील साखरे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन सदरचे प्रेत शेवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय कंधार येथे नेण्यात आले. मयत सचिन येटलवाड यांचे पश्चात पत्नी, आई, भाऊ असा परिवार आहे.घटनेचे वृत्त लिहीपर्यंत घटनेची पुढील प्रक्रिया कंधार पोलीस प्रशासन करत आहेत.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments