Homeकृषीसोनखेड शिवारात जिल्हाधिकाऱ्यांकडून पिकांच्या नुकसानीची पाहणी

सोनखेड शिवारात जिल्हाधिकाऱ्यांकडून पिकांच्या नुकसानीची पाहणी

नुकसानीची वस्तुनिष्ठ नोंद घेण्याच्या सूचना; शेतकऱ्यांनी रेशीम, दुग्ध व्यवसायातून अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत निर्माण करावेत

नांदेड | लोहा तालुक्यातील सोनखेड-कळंबर रस्त्यालगतच्या शेतशिवारात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सोयाबीन व कापूस पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून पिकांची सद्यस्थिती, पावसामुळे झालेले नुकसान आणि शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नुकसानीची अचूक नोंद घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

FB IMG 1789307346491 सोनखेड शिवारात जिल्हाधिकाऱ्यांकडून पिकांच्या नुकसानीची पाहणी

शेतकऱ्यांनी केवळ शेतीवर अवलंबून न राहता रेशीम शेती, दुग्ध व्यवसाय यासह विविध पूरक व्यवसायांचा अवलंब करावा. शासनाच्या उपलब्ध योजनांचा लाभ घेऊन उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी कर्डिले यांनी केले.

यावेळी उपविभागीय अधिकारी विलास नरवटे, तहसीलदार विठ्ठल परळीकर, तालुका कृषी अधिकारी कासराळे यांच्यासह महसूल व कृषी विभागाचे अधिकारी, शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments