Homeनांदेडडीजे वाजविल्यास कारवाई अटळ; गणेशोत्सव शांततेत साजरा करा

डीजे वाजविल्यास कारवाई अटळ; गणेशोत्सव शांततेत साजरा करा

हिमायतनगरच्या शांतता समितीच्या बैठकीत प्रशासनाचा इशारा; रस्ते खड्डेमुक्त, वीजपुरवठा सुरळीत व अतिक्रमण हटविण्याच्या मागण्या

हिमायतनगर, अनिल मादसवार | गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. 11) शांतता समितीची बैठक घेण्यात आली. जगदीश भंडारकर उपविभागीय पोलीस अधिकारी, भोकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गणेश मंडळांचे पदाधिकारी, युवक, लोकप्रतिनिधी व नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.

शासनाने डीजेवर बंदी घातलेली असून गणेशोत्सव काळात कोणीही डीजे वाजवू नये. डीजेमुळे ध्वनिप्रदूषण करून वातावरण दूषित केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई अटळ आहे, असा स्पष्ट इशारा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी दिला. सर्वांनी कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून गौरी-गणेशोत्सव उत्साहात आणि शांततेत साजरा करावा. हिमायतनगर शहराची शांततेची गौरवशाली परंपरा कायम ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले.

IMG20260911115221 01 डीजे वाजविल्यास कारवाई अटळ; गणेशोत्सव शांततेत साजरा करा
oplus_16

बैठकीत गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील अतिक्रमणे हटविणे, मुख्य रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, वीजपुरवठ्यातील लपंडाव थांबविणे, स्ट्रीट लाईट सुरळीत करणे तसेच मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी होणार नाही यासाठी आवश्यक उपाययोजना करणे, अशा विविध मागण्या उपस्थितांनी मांडल्या.

IMG20260911115319 scaled डीजे वाजविल्यास कारवाई अटळ; गणेशोत्सव शांततेत साजरा करा
oplus_2097152

यावेळी नायब तहसीलदार सिद्दीकी, पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, महावितरणचे अभियंता लाड , परमेश्वर ट्रस्टचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, मुख्याधिकारी समाधान मसाळ, नगराध्यक्ष रफिक भाई, माजी नगरसेवक प्रभाकर मुधोळकर, माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड, पुष्पा मुधोळकर, माजी जि.प. सदस्य समद खान पठाण, नगरसेवक आशिष सकवान, विठ्ठल ठाकरे, सरदार खान, सुभाष बल्पेलवाड, संजय माने, राम नरवाडे, उदय देशपांडे, पांडुरंग तुपतेवार, ज्ञानेश्वर शिंदे, फेरोज कुरेशी, सूरज दासेवार, अन्वर खान पठाण, विलास वानखेडे यांच्यासह सर्व नगरसेवक, नगरसेवक प्रतिनिधी, पत्रकार आणि गणेश मंडळांचे अध्यक्ष, सदस्य उपस्थित होते.

गणेशोत्सव काळात प्रशासन, पोलीस, नगरपरिषद, महावितरण तसेच गणेश मंडळांनी समन्वयाने काम करून उत्सव शांततेत पार पाडावा, अशी अपेक्षा बैठकीत व्यक्त करण्यात आली.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments