Homeनांदेडनांदेड अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना २ लाखांची मदत; जखमींना ५० हजार

नांदेड अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना २ लाखांची मदत; जखमींना ५० हजार

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून दुःख व्यक्त; PMNRF मधून सानुग्रह मदतीची घोषणा

नांदेड | महाराष्ट्रातील नांदेड येथे झालेल्या दुर्घटनेत जीवितहानी झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले असून, मृतांच्या कुटुंबीयांना प्रधानमंत्री राष्ट्रीय आपत्ती निधीतून (PMNRF) प्रत्येकी २ लाख रुपयांची सानुग्रह मदत देण्यात येणार असल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे.

दुर्घटनेतील जखमींच्या उपचारासाठीही प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली.

पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती देण्यात आली. दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांप्रती पंतप्रधानांनी संवेदना व्यक्त करत या दुःखद प्रसंगी सरकार त्यांच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments