‘माय माझी सरस्वती’, ‘शंभो शंकरा’, ‘येई बा विठ्ठले’, ‘बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल’, ‘कानडा राजा पंढरीचा’, ‘माझी रेणुका माऊली’, ‘मन लागो रे’ अशा भक्तिरसपूर्ण गीतांसोबतच ‘भातुकलीच्या खेळामधली राजा आणि ती राणी’, ‘रुपेरी वाळूत माडांच्या बनात’, ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ आणि ‘सत्यम शिवम सुंदरम’ यांसारख्या लोकप्रिय गीतांनी मैफिलीला रंगत आणली. प्रत्येक गीताला रसिकांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. श्री परमेश्वराच्या चरणी स्वरसेवा अर्पण करत कलाकारांनी संगीत आणि भक्तीचा अनोखा संगम घडवून आणला.


या मैफिलीत गायक परमेश्वर तिप्पनवार आणि माधुरीताई जाधव यांनी आपल्या सुरेल गायनाने रसिकांची मने जिंकली. प्राचार्य अंभोरे सर यांनी प्रभावी निवेदन केले. सुनील मांजरे व राजेश जाधव यांनी वाद्यवृंदाची साथ दिली, तर सचिन बोंपीलवार आणि कृष्णा बोंपीलवार यांनी पखवाज व तबल्याच्या तालाने कार्यक्रमाची रंगत वाढवली.


या संगीत सोहळ्याला श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, सचिव अनंता देवकते, सेवानिवृत्त मुख्याध्यापक अक्कलवाड सर, नगरसेवक डॉ. राजेंद्र वानखेडे, रामराव सूर्यवंशी, वऱ्हाडे सर, व्यंकटराव चवरे, लिंगारेड्डी तिप्पनवार, प्रभाकर मुधोळकर, सुभाष शिंदे, बाबुराव बंडेवार, ट्रस्टचे संचालक अनिल मादसवार, संजय माने, विलास वानखेडे, गजानन मुत्तलवाड, वामनराव पाटील वडगावकर, नगरसेवक सुभाष बलपेलवाड, ज्येष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड, पत्रकार अशोक आनगुलवार, व्यापारी बाळूअण्णा चवरे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.




तसेच राजदत्त सूर्यवंशी, मारोती लुमदे, साहेबराव अष्टकर, अविनाश संगणवार, राज यशवंतकर, प्रवीण कोमावार, परमेश्वर शक्करगे, अनंता मुत्तलवाड, सूर्यवंशी सर, अनुअप्पा दमकोडवार, मारोती हेंद्रे, सतीश गोपतवाड, पंडित ढोणे यांच्यासह श्री परमेश्वर भजनी मंडळी, महिला-पुरुष भाविक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित या मैफिलीने वाढोण्याच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेत आणखी एक सुरेल पर्व जोडले. भक्ती, संगीत आणि संस्कृतीचा संगम घडविणाऱ्या अशा उपक्रमांमुळे सामाजिक एकोपा दृढ होण्यासोबतच नव्या पिढीला भारतीय संगीतपरंपरेची ओळख होते. या सुरेल सोहळ्याने उपस्थित भाविकांना आनंद आणि आध्यात्मिक समाधानाची अनुभूती दिली. ॐकार संस्था, पुणे आणि ‘स्वरझंकार’च्या कलाकारांनी सादर केलेल्या या बहारदार मैफिलीचे उपस्थितांनी कौतुक केले. कोजागिरीच्या चांदण्यात न्हाऊन निघालेला हा भक्तिसंगीत सोहळा रसिकांच्या स्मरणात राहणारा ठरला.

कोजागिरीच्या चांदण्यात मसाला दुधाचा आस्वाद!
भावभक्ती गीत-संगीताच्या सुरेल मैफिलीनंतर रात्री बारा वाजता कोजागिरी पौर्णिमेच्या परंपरेनुसार चंद्राचे प्रतिबिंब दुधात पाहण्याचा आनंद घेत भाविकांना दुधाचे वितरण करण्यात आले. यावेळी शेकडो भाविकांनी चंद्राच्या शीतल चांदण्यात मसाला दुधाचा आस्वाद घेतला. भक्ती, संगीत आणि कोजागिरीच्या पारंपरिक उत्सवाचा आनंद द्विगुणित करणारा हा क्षण उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरला.
