रेल्वेत चोरट्यांचा डाव उधळला! नांदेड विभागात RPF ची धडक कारवाई; चोरीच्या संशयावरून अनेक जण ताब्यात

‘ऑपरेशन अमानत’मधून हरवलेली बॅग, मोबाईल मूळ मालकांना परत; अवैध रेल्वे तिकीट व्यवहारावरही कारवाई

NNL Team
By NNL Team

नांदेड, अनिल मादसवार| रेल्वे प्रवाशांच्या सामानावर डल्ला मारणारे चोरटे, खिसेकापू आणि अवैध तिकीट विक्री करणाऱ्यांविरुद्ध दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) धडक मोहीम राबवली आहे. १७ ते २३ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विविध कारवाया करत प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देतानाच हरवलेल्या वस्तू परत मिळवून देण्यात आणि अवैध तिकीट व्यवहार उघडकीस आणण्यात RPF ला यश आले आहे.

परभणी स्थानकावर चोरीच्या प्रयत्नांना आळा

परभणी रेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक १ आणि ३ वर संशयास्पद हालचालींवर पाळत ठेवताना प्रवाशांच्या सामानातून आणि खिशातून वस्तू चोरण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून दोन स्वतंत्र कारवायांत दोघांना पकडण्यात आले. तसेच नांदेड ते परभणीदरम्यान धावणाऱ्या रेल्वेत तपासणी करताना आणखी दोन संशयित व्यक्तींना ताब्यात घेऊन लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

या प्रकरणांत महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ११० व ११७ अंतर्गत कारवाई करण्यात आल्याचे रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने कळविले आहे.

IMG 20261025 WA0035 रेल्वेत चोरट्यांचा डाव उधळला! नांदेड विभागात RPF ची धडक कारवाई; चोरीच्या संशयावरून अनेक जण ताब्यात

₹८० हजारांची बॅग, मोबाईलही मिळवून दिला

‘ऑपरेशन अमानत’अंतर्गत १७ ऑक्टोबर रोजी गाडी क्रमांक १७६१२ मध्ये B3 कोचमध्ये बेवारस आढळलेली बॅग तपासल्यानंतर ती अजय सिंह यांची असल्याचे स्पष्ट झाले. बॅगेत सॅमसंग टॅबलेट, औषधे, ओळखपत्रे आणि कपड्यांसह सुमारे ८० हजार रुपयांच्या वस्तू होत्या. आवश्यक पडताळणीनंतर ही बॅग त्यांच्या भावाकडे सुपूर्द करण्यात आली.

२२ ऑक्टोबर रोजी परभणी रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आढळलेला सुमारे आठ हजार रुपये किमतीचा रेडमी मोबाईलही त्याच्या मूळ मालकाला परत करण्यात आला.

IMG 20261025 WA0034 रेल्वेत चोरट्यांचा डाव उधळला! नांदेड विभागात RPF ची धडक कारवाई; चोरीच्या संशयावरून अनेक जण ताब्यात

अवैध तत्काळ तिकीट व्यवहारावर गुन्हा

‘ऑपरेशन उपलब्ध’अंतर्गत गंगाखेड रेल्वे स्थानकावरील बुकिंग कार्यालयात केलेल्या कारवाईत जालना येथील २३ वर्षीय जुबेर शेख याच्याकडे देवगिरी एक्स्प्रेसचे दोन प्रवाशांसाठीचे तत्काळ आरक्षण तिकीट आढळले. तिकीट व्यवहारातील अनियमिततेप्रकरणी रेल्वे अधिनियम १९८९ च्या कलम १४३ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून तिकीट ब्लॉक करण्यात आले आहे.

बेपत्ता महिलेला कुटुंबीयांकडे सुरक्षित सुपूर्द – ‘ऑपरेशन डिग्निटी’अंतर्गत रेल मददवरील तक्रारीनंतर RPF कर्मचाऱ्यांनी हिंगोली रेल्वे स्थानकावर सुमारे ४५ वर्षीय तुळसाबाई यांचा शोध घेतला. त्या सुरक्षित आढळल्यानंतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून त्यांना त्यांच्या पती आणि भावाच्या स्वाधीन करण्यात आले.

रेल्वे प्रवाशांची सुरक्षा, हरवलेल्या वस्तूंची परतफेड आणि चोरी तसेच अवैध तिकीट व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नांदेड विभागातील RPF कडून अशा मोहिमा सातत्याने राबविण्यात येत आहेत. प्रवाशांनीही आपले सामान सांभाळावे आणि संशयास्पद हालचाली आढळल्यास रेल्वे सुरक्षा यंत्रणेला त्वरित माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Share This Article
Follow:
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Leave a comment
error: Content is protected !!