नांदेड| अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने शहरातील विठ्ठल नगरात १६ जानेवारी रोजी तिळगुळ (Sesame jaggery program completed) कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी शिक्षणाची जननी माता सावित्री फुले यांच्या प्रतिमेस हार घालून अभिवादन करण्यात आले.

तसेच महागाई च्या विरोधात राज्यपाल महोदयांना लाखो सह्यांचे निवेदन देण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यातून किमान १० हजार सह्या राज्य कमिटीस पाठविण्यात येणार आहेत. म्हणून सह्यांची मोहीम देखील राबविण्यात आली.या मोहिमेत महिलांसह पुरुष देखील मोठा प्रतिसाद देत आहेत.
जमसं च्या वतीने राज्य आणि देशभर तिळगुळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. यावेळी विठ्ठल नगर कमिटी निवडण्यात आली.

जमसंच्या जिल्हाअध्यक्षा कॉ.लता गायकवाड व सीटूच्या राज्य कमिटी सभासद व जमसंच्या जिल्हा उपाध्यक्षा कॉ.करवंदा गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. नूतन कमिटीच्या अध्यक्ष पदी सारिका केदारे, उपाध्यक्ष सुरेखा घुले तर सचिवपदी गंगाबाई गायकवाड आदींची निवड करण्यात आली. उपरोक्त कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. अशी माहिती अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या जिल्हाध्यक्षा कॉ.लता गायकवाड यांनी दिली आहे.
