हिमायतनगर,आकांक्षा मादसवार| शहरातील सराफा लाईनमधील श्री महालक्ष्मी सखी ग्रुपच्या वतीने गुरुवारी पौष महिन्यातील महत्वाचा सण मकरसंक्रांती निमित्त हळदी कुंकवाच्या (Haldi kunkwa) कार्यक्रमांचा आयोजन करण्यात आलं होत. यात महिला मंडळींनी औषधी गुणधर्म असलेल्या वृक्षांच वितरण करून वृक्ष संवर्धन आणि त्याचे जतन करण्याचा (A message of tree conservation) अनोखा संदेश दिला आहे.

हिमायतनगर शहरातील सौ.अनिताबाई सकवान यांच्या निवासस्थानी मकरसंक्रांतीचे औचित्य साधून दिनांक १६ रोज गुरुवारी हळदी कुंकू कार्यक्रमांचे आयोजन श्री महालक्ष्मी सखी ग्रुपच्या (Shree Mahalakshmi Sakhi Group) माध्यमातून करण्यात आले होते. हिंदू रितीरिवाजाला अनुसरून हळदीकुंकवाच्या कार्यक्रमात देवाधिदेव महादेवाचे प्रिय असलेल्या शमीपत्राचे झाड, बेल, आवळा आणि इतर पर्यावरणपूरक वृक्ष वाणाच्या रूपात वितरित करून वृक्ष संवर्धन आणि त्याचे जतन करण्याचा संदेश देण्यात आला.

आजच्या परिस्थितीत पर्यावरणाचा ऱ्हास होऊ लागला असून, मनुष्य जीवनात अतिमहत्वाची असलेली वृक्ष दुर्लभ होत चालली आहेत. त्यांचे जतन झाले पाहिजे आणि पर्यावरणाचा समातोल राखण्यास मदत मिळाली पाहिजे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या हळदी कुंकू कार्यक्रमाला हिमायतनगर शहरातील सर्व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित होऊन प्रतिसाद दिला. तसेच अनेकांनी या सामाजिक संदेश देणाऱ्या स्तुत्य उपक्रमाचे कौतूक केलं.

सामाजिक दायित्व लक्षात घेऊन समाजात पर्यावरणाबद्दल एक आपुलकी निर्माण व्हावी आणि औषधी गुणधर्म असलेल्या वृक्षांची माहिती सर्वाना मिळावी म्हणून श्री महालक्ष्मी सखी ग्रुपच्या वतीने या अनोख्या कार्यक्रम आयोजिन करण्यात आलं होत. या कार्यक्रमांत सौ.अनिताबाई सकवान, सौ अश्विनी चिंतावार यांच्यासह सौ कांचन सकवान, सौ पूजा पळसकर, सौ ज्योत्स्ना पळसकर, सौ सुमन मुंडावरे, सौ सुनिता देवसरकर, सौ शितल चिंतावार, सौ माधुरी आरेलवार, सौ भाग्यश्री येरावार, सौ प्रतिभा पांडे, सौ पुष्पा माळवी, आणि इतर महिला मंडळींनी सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी केला आहे.
