नांदेड| येथील दत्तनगर भागातील रहिवाशी सरदार प्रीतमसिंघ कामठेकर यांची लेक सौ. अनीताकौर भ्र. मनदीपसिंघ चव्हाण (कामठेकर) यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठावाडा विद्यापीठ नांदेड तर्फे हिंदी विषयात पीएचडी प्रदान करण्यात आली आहे.

सौ. अनीताकौर यांनी परभणी येथील शिवाजी महाविद्यालय येथील हिंदी विभाग प्रमुख प्रा. डॉ एस. एल. राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली “श्री गुरु गोबिंदसिंघजी का हिंदी साहित्य में योगदान” या विषयावर शोधप्रबंध लिहून स्वामी रामानंद तीर्थ मराठावाडा विद्यापीठात सादर केला. विद्यापीठाने सौ. अनीताकौर यांचा शोधप्रबंध स्वीकारून त्यांना हिंदी विषयात पीएचडी उपाधि प्रदान केली आहे.

सौ. अनीता कौर कामठेकर यांच्या या यशा बद्दल स्थानीक शीख समाज, त्यांच्या मित्र परिवार, कामठेकर परिवार तसेच खामगांव येथील चव्हाण परिवारातर्फे अभिनन्दन करण्यात आले आहे.
