श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर कोणत्याही एकाच ध्येयावर लक्ष केंद्रित करून ते प्राप्त करण्यासाठी परिश्रम घ्यावे परिस्थिती आड आली तरी ध्येय गाठावे परीस्थीतीचा सामना करावा यश मिळल्या शिवाय राहणार नाही असे आवाहन माहूर पोलीस स्टेशनचे सपोनी सुनील गायकवाड यांनी केले.

श्री रेणुकादेवी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने युथ फॉर माय भारत – युथ फॉर डिजिटल लिटरसी या विषयाच्या जनजागृतीसाठी सात दिवसीय निवासी शिबीराचे उद्घाटन प्रसंगी १६ जानेवारी रोजी उमरा येथे प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.श्री रेणुकादेवी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना चे विशेष शिबिर उमरा येथे १५ जानेवारी ते २१ जानेवारी पर्यंत संपन्न होणार आहे,यामध्ये आपत्ती व्यवस्थापन, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ति, प्रजनन आरोग्य, किशोरावस्था,हागणदारी मुक्त गाव, महिला मेळावा, ग्रामस्वछता,सुलभ शौचालयाच्या बांधणीसाठी जनजागृती, मनोरंजनातून ग्रामस्थांचे व विद्यार्थीचे प्रबोधन, पर्यावरण शिक्षण, एड्स जाणीव जागृती, महिला आरोग्य, वृक्षारोपण व नेतृत्व विकास, बालविवाह प्रतीबंध, मतदान जनजागृती,ई शिबिरात उपक्रम होणार आहे.

शिबीराच्या उद्घाटन अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.तुळशीदास गुरनुले होते .तर प्रमुख पाहुणे म्हणून नंदकुमार जोशी, राजू ठाकूर, एकनाथ मानकर , वनरक्षक गमे,तंटामुक्ती अध्यक्ष दिलीपराव देशमुख, पोलिस पाटील विठ्ठलराव देशमुख, गावातील प्रतिष्ठित नागरिक इ. मान्यवरांची उपस्थिती होते.

शिबीराचे सूत्रसंचालन दूगाळे यांनी केले तर प्रास्ताविक रासेयो सहसमन्वयक डॉ.अवधूत लांडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. अभिजीत कांडलीकर यांनी केले. या कार्यक्रमास विद्यार्थी, प्राध्यापक, स्वयंसेवक, तसेच ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
