If you want to succeed : जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर ध्येयावर लक्ष केंद्रित करावे – सपोनी गायकवाड
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर कोणत्याही एकाच ध्येयावर लक्ष केंद्रित करून ते प्राप्त करण्यासाठी परिश्रम घ्यावे परिस्थिती आड आली तरी ध्येय गाठावे परीस्थीतीचा सामना करावा यश मिळल्या शिवाय राहणार नाही असे आवाहन माहूर पोलीस स्टेशनचे सपोनी सुनील गायकवाड यांनी केले.
श्री रेणुकादेवी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने युथ फॉर माय भारत - युथ फॉर डिजिटल लिटरसी या विषयाच्या जनजागृतीसाठी सात दिवसीय निवासी शिबीराचे उद्घाटन प्रसंगी १६ जानेवारी रोजी उमरा येथे प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.श्री रेणुकादेवी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना चे विशेष शिबिर उमरा येथे १५ जानेवारी ते २१ जानेवारी पर्यंत संपन्न होणार आहे,यामध्ये आपत्ती व्यवस्थापन, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ति, प्रजनन आरोग्य, किशोरावस्था,हागणदारी मुक्त गाव, महिला मेळावा, ग्रामस्वछता,सुलभ शौचालया...
