HomeनांदेडDr. Kabde group win | नांदेड एज्युकेशन सोसायटी निवडणुकीत डॉ.काब्दे गटाचे सर्वच्या...

Dr. Kabde group win | नांदेड एज्युकेशन सोसायटी निवडणुकीत डॉ.काब्दे गटाचे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी -NNL

नांदेड| स्वामी रामानंद तिर्थ यांनी स्थापण केलेल्या नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या झालेल्या मतदानानंतर डॉ.काब्दे यांनी विरोधी गटला व्हाईट वॉश दिला असून, या निवडणुकीत डॉ. काब्दे गटाचे सर्वच्या सर्व 9 उमेदवार विजयी झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या 9 जागेसाठी शनिवार दि.27 रोजी मतदान घेण्यात आले.या निवडणुकीत दोन पॅनल आमने- सामने उभे होते.निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष डॉ.काब्दे व त्यंाच्या पॅनलला टक्कर देण्यासाठी स्वामी रामानंद तिर्थ यांच्या नावे अ‍ॅड चैतन्य बापू देशमुख यांनी डॉ.काब्दे गटाला आव्हान दिल्याने निवडणुकीत रंग भरला होता मागील निवडणुकीत डॉ.काब्दे गटाला 9 पैकी 6 जागांवर समाधान मानावे लागले होते. आज झालेल्या नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या निवडणुकीत मतदारांची संख्या 116 पैकी 100 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता.या निवडणुकीत डॉ.काब्दे गटाने समोरील उमेदवारांना व्हाईट वॉश देण्याची तयारी केली होती.

शनिवार दि.27 रोजी या निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया पार पडली.त्यानंतर शनिवारी सायंकाळी मतमोजनी पार पडली. यात डॉ.काब्दे गटाचे सी.ए. प्रवीण पाटील (68), डॉ.उमेश भालेराव, (67) डॉ.व्यकंटेश काब्दे (66), श्यामल पत्की (66), शांभवी साले (63) नौनिहालसिंघ जाहगिरदार (62), अ‍ॅड,सी.बी.दागडीया (57), प्रफुल्ल अग्रवाल (56), अ‍ॅड.प्रदीप नागापुरकर (55), अशी मते घेवून निवडून आले आहेत. तर विरोधी उमेदवार अ‍ॅड,चैतन्यबापू देशमुख यांना सर्वाधिक (50) मते मिळाली आहेत. त्यांच्या अन्य उमेदवारांना 50 पेक्षा कमी मते मिळाली आहेत.

मागील निवडणूकीत तीन जागांवर विजय मिळविणार्‍या उमेदवारांना यंदाच्या निवडणुकीत डॉ. काब्दे गटाने व्हाईट वॉश देत 9 च्या 9 जागा जिंकल्या आहेत. तर प्राध्यापकांमधून ए.टी.शिंदे व विलास वडजे हे विजयी झाले आहेत. नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या निवडणुकीत डॉ.काब्दे गटाने बाजी मारल्याने त्यांचे सर्व स्तरातून आभिनंदन केले जात आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments