नवीन नांदेड l गणेशोत्सव काळात पोलीस बंदोबस्त देऊन व विसर्जन मिरवणूक मध्ये सहकार्य करणाऱ्या ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर व सहकारी अधिकारी यांच्या ओंकार गणेश मंडळ हडको यांच्या वतीने भव्य सत्कार करून गणेश मुर्ती भेट पदाधिकारी यांनी दिली.


सिडको हडको भागात गेल्या चाळीस वर्षांपासुन भाविक भक्तांचा नवसाला पावणारा ओंकार सार्वजनिक गणेश मंडळ असुन दरवर्षी प्रमाणे याही वर्षी हैदराबाद येथुन आकर्षक मुर्ती आणुन विधीवत पूजन करून स्थापना केली होती,मंडळ पदाधिकारी यांच्या वतीने भव्य मंडप दैनंदिन महाआरती या शिवाय सामाजिक बांधिलकी जोपासत विविध उपक्रम व शालेय साहित्य वृक्षारोपण यांसह अनेक उपक्रम राबविले होते.


नवसाला पावसाला गणपती बाप्पा असल्याने दैनंदिन भाविक भक्तांची होणारी गर्दी पाहता ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला होता,तर श्री विसर्जन मिरवणूक मध्ये सहकार्य करणारे पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर,सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार कांबळे यांच्या सह उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मठवाड व पोलीस कर्मचारी यांच्या गणेशोत्सव काळात केलेल्या सहकार्या बदल गणेश मुर्ती देऊन सत्कार केला यावेळी विनोद जाधव, महेश शिंदे, संजय श्रीरामे,मयुर अमिलकंठवार, अशोक गुढेवार,महारूद्र खराणे,गिरे,राम मोरे, विनोद सुरसे व पदाधिकारी यांनी केले.




