हिमायतनगर| हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय हिमायतनगर येथील प्राध्यापक डॉ.के कदम स्वयंचलित लेखक ऊस तोडणी कामगार समकालीन विमर्श हा ग्रंथ लिहिला असून महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्जवला सदावर्ते यांच्या हस्ते ग्रंथाचे अनावर करण्यात आले. त्याचबरोबर महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

ऊस तोडणी कामगाराचे सामाजिक जीवन त्याचप्रमाणे आर्थिक जीवन व त्यांच्या मुलाबाळाचे शैक्षणिक जीवन या ग्रंथामध्ये रेखाटले आहे. त्याचबरोबर ऊस तोडणी कामगाराचे समस्या व त्यांचे आयुष्य त्यांनी जी उचल उचलेली असते त्यांच्यावरती कसे अवलंबून आहे हे आपण या ग्रंथांमध्ये पाहू शकतो.

महाविद्यालयातील ग्रंथालय विभागास सरांनी दहा प्रति ग्रंथ भेट दिल्या.ग्रंथपाल बोंबले राजू यांनी ग्रंथ स्वीकारून सरांना खूप खूप शुभेच्छा दिल्या व महाविद्यालयातील प्राचार्य तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सरांचे खूप खूप अभिनंदन केले .
