HomeनांदेडDepartment of Social Welfare : समाज कल्याण विभागाची विभागीय क्रीडा स्पर्धा नांदेडमध्ये...

Department of Social Welfare : समाज कल्याण विभागाची विभागीय क्रीडा स्पर्धा नांदेडमध्ये उत्साहात संपन्न

नांदेड| विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत खेळाला महत्त्व दिले पाहिजे कारण याच विद्यार्थ्यामध्ये भविष्यातील सचिन तेंडुलकर दडला आहे, असे प्रेरणादायी विचार (Department of Social Welfare) समाजकल्याणचे विभागीय प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांनी व्यक्त केले.

समाज कल्याण विभागीय क्रीडा स्पर्धा-2025 नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा प्रांगणात आयोजन करण्यात आले. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाचे कुलसचिव शशिकांत ढवळे, जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे, सेवानिवृत्त समाजकल्याण अधिकारी बी. एस. दासरी, विद्यापीठाचे सहा.अधिक्षक सुनिल ढाले उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या मानसिक व शरिरीक सर्वांगिन विकासासाठी खेळ हे अविभाज्य घटक असल्याचे मत प्रास्ताविक समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी व्यक्त केले. मराठवाड्याच्या मातीत खेळाचे गुण उपजत असल्याचे शशिकांत ढवळे यांनी सांगितले. बी. एस. दासरी यांनी आपले मनोगत व्यक्त करून मार्गदर्शन केले. या स्पर्धचे सुत्रसंचलन गजानन पंपटवार व डॉ. दिलीप माने यांनी केले. या विभागीय क्रीडा स्पर्धेत धावणे, थालीफेक, खोखो, रिले अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

विभागीय क्रीडा स्पर्धा प्रथमच नांदेड जिल्ह्यात घेण्यात येत असून त्या उत्साहात सुरू झाल्या. या स्पर्धेत नांदेड, लातूर, धाराशिव, हिंगोली येथील अनु.जाती मुला-मुलींचे शासकिय निवासी शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. या विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी खेळाडूंचे जिल्हानिहाय पथसंचलन करून मान्यवरांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर मंचावर उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. विविध जिल्ह्यातून जवळपास 500 विद्यार्थ्यांनी या विभागीय क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतला.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments