Department of Social Welfare : समाज कल्याण विभागाची विभागीय क्रीडा स्पर्धा नांदेडमध्ये उत्साहात संपन्न
नांदेड| विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत खेळाला महत्त्व दिले पाहिजे कारण याच विद्यार्थ्यामध्ये भविष्यातील सचिन तेंडुलकर दडला आहे, असे प्रेरणादायी विचार (Department of Social Welfare) समाजकल्याणचे विभागीय प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांनी व्यक्त केले.
समाज कल्याण विभागीय क्रीडा स्पर्धा-2025 नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा प्रांगणात आयोजन करण्यात आले. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाचे कुलसचिव शशिकांत ढवळे, जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे, सेवानिवृत्त समाजकल्याण अधिकारी बी. एस. दासरी, विद्यापीठाचे सहा.अधिक्षक सुनिल ढाले उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या मानसिक व शरिरीक सर्वांगिन विकासासाठी खेळ हे अविभाज्य घटक असल्याचे मत प्रास्ताविक समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त शि...
