नांदेड| आज १८ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेला सकल मराठा समाजाचा नांदेड येथील आक्रोश मोर्चा स्थगित करण्यात आला असल्याची माहिती मराठा आंदोलक श्याम पाटील वडजे (Shyam Patil Vadje) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सकल मराठा समाज तर्फे मस्साजोग चे सरपंच कै.संतोष देशमुख यांच्या हत्येसंदर्भात १८ जानेवारी रोजी भव्य आक्रोश मोर्चा काढला जाणार होता असे सकल मराठा समाजच्या ११जानेवारीच्या बैठकीत ठरले होते. त्या अनुषंगाने शासनाने आरोपी विरोधात मकोका लावून आरोपींना पोलीस कोठडीत पाठविले त्यामुळे नियोजित असलेला नांदेड येथील आक्रोश मोर्चा तुर्त स्थगित करण्यात आल्याची माहिती मराठा सेवक श्याम पाटील वडजे यांनी दिली.

जनमानसात दहशत निर्माण करणा-या मस्साजोग घटनेने माणुसकीला काळीमा फासला आहे. नांदेड साठी बीड जिल्ह्यातील मंत्री हे शासनाने पालकमंत्री म्हणून नेमू नयेत.२६ जानेवारी प्रजासत्ताक दिना निमित्त बीडचे मंत्री नियुक्त करू नये.असेही श्याम पाटील वडजे यावेळी म्हणाले. या पत्रकार परिषदेला दशरथ पा.कपाट, गोविंद कदम शिर्शीकर,सुनील पाटील कदम,नाना पाटील बेटसांगवीकर, भास्करराव हंबर्डे,सुभाष कोल्हे,दत्ता खराटे ,सुधीर देशमुख ,नवनाथ जोगदंड ,राज सरकार ,दत्ता इंगळे, डॉ बालाजी पेनूरकर व समस्त समाज बांधव उपस्थित होते..
